Sunday , September 22 2024
Breaking News

निपाणी पीकेपीएसला 15.33 लाखांचा नफा

Spread the love

 

अध्यक्ष महेश बागेवाडी : 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
निपाणी (वार्ता) : 116 वर्षांची परंपरा असलेल्या निपाणी कृषी प्राथमिक सेवा संघाला चालू आर्थिक वर्षात 15.33 लाखांचा नफा मिळाला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांच्या सहकार्याने संस्थेला 5.60 कोटी रूपयांची आर्थिक पत मंजूर झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश बागेवाडी यांनी दिली. संस्थेच्या 116 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ सभासद डॉ. बी. व्ही. कोठीवाले हे होते.
अध्यक्ष बागेवाडी म्हणाले, पीकेपीएसचे 1103 सभासद असून 67.03 लाखांचे भागभांडवल आहे. संस्थेकडे 21.16 लाखांचा राखीव निधी आहे. तर, 28.50 लाखांच्या ठेवी आहेत. संस्थेने 3.57 लाख रूपयांची पीक कर्जे उपलब्ध करून दिली असून संस्थेला ऑडिट अ चा दर्जा मिळाला आहे. यावर्षी 11% लाभांश वितरण करण्यात आले आहे. सभासदांच्या संमत्तीने लाभांशाची 7 लाखांची रक्कम अंमलझरी येथील श्री महादेव मंदिर आणि निपाणी हुडको कॉलनी येथील श्री विरभद्रेश्वर मंदिराच्या विकासासाठी खर्च करण्याचे ठरविण्यात आले आहे. संस्थेच्या 616 सभासदांना माजी खासदार आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन रमेश कत्ती यांच्या सहकार्याने 5.60 कोटींची पीककर्जे पत मंजूर करण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातून सभासद, शेतकर्‍यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित साधण्याचे काम निरंतरपणे सुरू आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दिपप्रज्वलनाने सभेस सुरूवात झाली. अहवाल वाचन संस्थेचे सचिव संजय वसेदार यांनी केले. सभेसमोरील विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सम्मती दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, सचिन कौंदाडे, शिवाजी खोत यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याबद्धल समाधान व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष महेश बागेवाडी आणि उपाध्यक्ष बाबासाहेब चंद्रकुडे यांचा सत्कार करण्यात आला. सभेस संचालक मलगोंडा उर्फ शिवरूद्र पाटील, बाबुराव लाटकर, उज्वला भोसले, आशाताई पाटील, अनिल नाईक, सोमराय यमगार, गजानन सुतार, महादेव पाटील आदींची उपस्थिती होती. संस्थेचे ज्येष्ठ सभासद चंद्रकांत तारळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

विश्वकर्मा उद्यान लोकसह‌भागातून आदर्श बनवूया

Spread the love  नामदेव चौगुले : लोकसह‌भागातून १०० रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *