Thursday , September 19 2024
Breaking News

वडगाव चावडी, जनावरांचा दवाखाना समस्यांच्या विळख्यात

Spread the love

 

बेळगाव : वडगाव चावडी आणि जनावरांचा दवाखाना एकाच इमारतीत आहे. सदर इमारत मनपाच्या अखत्यारीत येते. त्याठिकाणी जनावरांचा दवाखाना आणि तलाठी कार्यालय आहे. मात्र या इमारतीत वीज जोडणी नाही की जनावरांना लागणारी औषधे ठेवण्यासाठी फ्रीजची सोय नाही. वारंवार मागणी करून देखील संबंधित लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी देखील या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे सदर कार्यालय मनपाच्या अखत्यारीत असून देखील इथे वीज जोडणी नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे व या अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी अनेक बेकायदेशीर कृत्ये घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. दररोज रात्री या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच मद्यपान करून तिथेच बाटल्या फोडून जाणे, सिगारेटची पाकिटे व इतर कचरा इतरत्र टाकून जाणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे सकाळी दवाखाना व चावडीचे कर्मचारी तो कचरा साफ करून नंतरच जनावरांच्या तपासणीची सुरुवात होते. हा रोजचा कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे देखील वाऱ्याने इतरत्र विखुरला जातो व परिसरात अस्वच्छता पसरते. या संदर्भात संबंधित विभागातील नगरसेवकांशी संपर्क साधून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विनंती केली होती. मात्र नगरसेवकांनी देखील या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसून येत आहे.
जनावरांचा दवाखाना आणि चावडीसाठी इतरत्र सरकारी जागेत स्थलांतरित करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आणि रयत संघटनेने केली आहे.
यापूर्वी देखील संबंधित अधिकाऱ्यांना अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे. आगामी कर्नाटक हिवाळी अधिवेशनाच्या वेळी संबंधित मंत्र्यांना निवेदन देऊन पुन्हा एकदा या समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *