Thursday , September 19 2024
Breaking News

करणीबाधा करण्यासाठी चक्क जिवंत डुक्कराचा वापर!

Spread the love

 

 

खानापूर : खानापूर-हेम्मडगा रस्त्यावर रूमेवाडी क्रॉसनजीक विलास बेडरे व ज्योतिबा बेडरे यांच्या शेतात करणीबाधेचा प्रकार उघडकीस आला असून चक्क डुकराला जिवंत पुरण्यात आल्याचे दिसून आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर-हेम्मडगा रस्त्यावर रूमेवाडी क्रॉसनजीक विलास बेडरे व ज्योतिबा बेडरे यांची शेत आहे. दोघे बंधु नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असता काही कुत्री आरडाओरड करत असल्याचे ऐकु आले. दोघांनाही संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, करणीबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात आले. सदर ठिकाणी कुवाळे, अंदाजे २० नारळ, पानविडे, लिंबू, बिब्बे, हळकुंडे, मोहरी, तसेच जंगली प्राण्याचे सुळे असे बरेच साहित्य आढळून आले. तसेच बाजूला खड्डा खणून त्यात जिवंत डुकराला पुरण्यात आले होते. पण कुत्र्यांनी माती उकरून डुकराला बाहेर काढले असल्याने डुक्कर खड्याच्या बाहेर पडला होता. कुत्र्यांनी चावा घेतल्याने डुक्कर जखमी अवस्थेत पडून होते. डुकराचे चारी पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते. हे ठिकाण तीन गावच्या सीमेवर असल्याने येथे नेहमीच जादुटोण्याचे व करणीबाधेचे प्रकार घडत असतात. त्यामुळे या परिसरात हा चर्चेचा विषय असून शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न

Spread the love  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *