Thursday , September 19 2024
Breaking News

पुण्यात ७ रोजी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव

Spread the love

 

गोव्यातून उमेश शिरगुप्पे, गुलाब वेर्णेकर यांचा समावेश

पणजी (प्रतिनिधी) : आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी ज्या भिडेवाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा चालवली. प्रत्यक्ष त्या भिडेवाड्यात मातीच्या ढिगाऱ्यावर बसून भिडेवाडाकार कवी लेखक विजय वडवेराव यांनी व सन २०१४ मध्ये लिहिलेली ‘भिडेवाडा बोलला’ कविता आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. वडवेराव यांनी ‘भिडेवाडा’ या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव ७ जुलै रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह पिंपरी-पुणे येथे आयोजित केला आहे. या काव्य महोत्सवात गोव्यातून कवी उमेश शिरगुप्पे आणि कवयित्री गुलाब वेर्णेकर सहभाग असणार आहे.
गुजरात, केरळ, कर्नाटक यासोबतच संपूर्ण महाराष्ट्र तसेच विदेशातून २०० कवी, कवयित्री सहभागी होणार आहेत. महोत्सवात मान्यवर कवितांतून भिडेवाड्याचा इतिहास मांडतील. पुढील पिढीसाठी भिडेवाड्याचा इतिहास जतन करून ठेवण्याचे माठे काम या काव्य महोत्सवातून होईल.
भिडेवाडा या वास्तूबद्दल महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, वस्ताद लहुजी साळवे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल लोकांनी माहिती शोधावी, वाचन करावे, अभ्यास करावा व आशयघन लेखन करावे या एकमेव एकमेव उद्देशाने उद्देशाने मार्च २०२४ मध्ये या भिडेवाडा बोलला या राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *