बेळगाव : तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करण्यासाठी समितीची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने पुनर्रचना करण्यात आली आणि ३५ जणांची कमिटी जाहीर करून त्या कमिटीमधून समितीचे नवे पदाधिकारी निवडणार निवडण्यात येणार असल्याचा ठराव तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
तालुका म. ए. समितीची बैठक रविवारी (दि. २५) रेल्वे ओव्हर ब्रीज येथील मराठा मंदिर येथे झाली. माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीच्या प्रारंभी तालुक्यातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गेल्या महिनाभरात गावागावांत फिरून १३ जणांच्या समितीने सुमारे ४०० जणांची नावे आपल्याकडे आली असल्याची माहिती दिली. अजूनही काही गावांतून नावे येणार आहेत, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता लोकांच्या मागणीनुसार नवी कार्यकारिणी निवडण्याबाबत घोषणा करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांतून यावेळी ३५ जणांची नावे देण्यात आली. या ३५ जणांना तालुका समितीची नवी कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार देण्यात आले.
अध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले की, समिती बळकट करण्यासाठी युवा वर्गाला संधी देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्याची दखल घेत आता नवी कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. कार्यकारिणीबरोबरच गावपातळीवर संघटना बळकटीसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करणे, महिला आणि युवा आघाडी स्थापन करणे अशी कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या संमतीने नवी कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार ३५ जणांना देण्यात आला आहे, असे सांगितले. यावेळी कृष्णा हुंदरे, डी. बी. पाटील, बी. डी. मोहनगेकर, पियूष हावळ, शिवाजी खांडेकर, मनोज पावशे, मनोहर संताजी, मनोहर हुंदरे, आर. के. पाटील, रामचद्र मोदगेकर, राजू लोहार, राजू मन्नोळकर, आर. एम. चौगुले आदींनी मनोगत व्यक्त करून नव्या कार्यकारिणीबाबत विविध सूचना केल्या. बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऍड. एम. जी. पाटील यांनी स्वागत करून आभार मानले.
३५ जणांची समिती अशी
मनोहर किणेकर, लक्ष्मण होनगेकर, आर. एम. चौगुले, आर. के. पाटील, एम. जी. पाटील, अनिल पाटील, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, आर. आय. पाटील, मनोहर संताजी, विठ्ठल पाटील, यल्लाप्पा रेमाण्णाचे, मनोहर हुंदरे, डी. बी. पाटील, सुभाष मरुचे, मल्लाप्पा पाटील, बाळू फगरे, नारायण सांगावकर, मल्लाप्पा गुरव, दीपक आमरोळकर, अनिल तुडयेकर, किरण पाटील, शिवाजी जोगाणी, कमल मन्नोळकर, वैष्णवी मुळीक, प्रेमा मोरे, महेंद्र जाधव, ऍड. प्रसाद सडेकर, पीयूष हावळ, कृष्णा हुंदरे, अंकुश पाटील, चेतन पाटील, तुळसा पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील आणि दीपक पावशे.