Thursday , September 19 2024
Breaking News

बेळगावच्या 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी केली अटक

Spread the love

 

बेळगाव : बागलकोट येथे बसमध्ये चढताना, महिलांचे दागिने लांबवणाऱ्या बेळगाव येथील 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 लाख रुपये किमतीचे 91 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोशनी हरिदास चौगुले (वय 30) रामनगर-वड्डरवाडी, रेणुका रवी वरगंडे (वय 22) गँगवाडी तसेच सविता साईनाथ लोंढे (वय 34) गँगवाडी अशी त्यांची नावे आहेत. बागलकोट शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

बेळगाव येथून जाऊन या महिला बागलकोटमध्ये चोरी करीत होत्या. गेल्या सोमवार दिनांक‌ 19 ऑगस्ट रोजी बागलकोट शहर बसस्थानकावर हुबळी बसमध्ये चढताना भारती लिंगबसय्या हिरेमठ (वय 38) या महिलेच्या व्हॅनिटी बॅगमधून सुमारे 6 लाख 60 हजार रुपये किमतीचे 11 तोळ्यांचे दागिने चोरीस गेले होते. यासंबंधी बागलकोट शहर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महांतेश्वर जिद्दी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुनाथ चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक जे. वाय. नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि. 29 रोजी या तीन महिलांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी बसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळून 91 ग्रॅम 98 मिली सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *