धुणं धुण्यासाठी गेल्यानंतर काळाचा घाला
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला असून हे तिघेही एकाच कुटुंबातील होते. धुणं धुण्यासाठी कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले असता ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले होते. यावेळी तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीकाठी धाव घेतली. काहींनी गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे
उदय बचाराम कटाळे, अरुण बचाराम कटाळे, प्रकाश अरुण कटाळे, अशी मृतांची नावे आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta