बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांच्या ८१ व्या यशस्वी कारकीर्दबद्दल नागरी सत्कार सोहळा आयोजन समिती बिजगर्णी -कावळेवाडी यांच्यावतीने १५ मे रोजी बिजगर्णी हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे
या कार्यक्रमाला अध्यक्ष गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी (माजी आमदार), मालोजीराव अष्टेकर (माजी महापौर), प्रा.डी. एन. मिसाळे (माजी प्राचार्य), शिवाजी कागणीकर (समाज सेवक), प्रा. आनंद मेणसे (माजी प्राचार्य), गोपाळ गावडा (निवासी संपादक पुढारी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी गावातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमीनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजन समिती अध्यक्ष पी. पी. बेळगावकर, वाय. पी. नाईक, एस. एम. जाधव व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
Check Also
प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार
Spread the love बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …