खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीत खानापूर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णाची गैरसोय होऊ नये. रूग्णाना वेळेत उपचार व्हावेत. यासाठी खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या स्थानिक क्षेत्र विकास अनुदानातुन रुग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा शुक्रवारी दि. ११ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या.
यावेळी जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. मुन्याळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे, डाॅ. नारायण वडियर, तालुका काँग्रेसचे ब्लाॅक अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, तसेच डॉ. अंजलीताई फौंडेशन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी रूग्णवाहिकांचे पूजन केले. त्यानंतर फित कापून रूग्ण वाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, खानापूर तालुक्यात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. मात्र नागरिकांना कोणतीही भिती मनात बाळगु नये. खानापूर उपचार कमी पडले तर बेळगाव जिल्हा दवाखान्यात उपचारासाठी लागलीच जाण्यासाठी तीन रूग्णवाहिकांची सोय झाली आहे. इतर तालुक्याच्या मानाने खानापूर तालुक्यात रूग्णाची सोय उत्तम झाली आहे. तेव्हा रूग्णानी घाबरून न जातो. संकटाला धैर्याने तोंड दिले पाहिजे असे सांगितले.
यावेळी तहसीलदार रेश्मा तालिकोटी, तालुका आरोग्यधिकारी डॉ. संजीव नांद्रे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने, नगराध्यक्ष मजहर खानापूरी, ब्लॉक अध्यक्ष कोळी, नगरसेविका , नगरसेवक, तालुका अधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.