बेळगाव : समर्थ नगर येथील 5 व्या क्रॉसमधील युवक मंडळातर्फे कोरोना योद्धा सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला आहे. सुरेंद्र अनगोळकर यांनी कोरोना काळात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ते फूड फॉर निडीच्या माध्यमातून रुग्णांना जेवण तसेच मोफत रुग्णवाहिका सुविधा पुरवित आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल समर्थ नगर युवक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास अनिल अष्टेकर, भारत नागरोळी, निलेश पाटील आणि समर्थ नगर 5 व्या क्रॉसमधील नागरिक उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …