निपाणी : शिरगुप्पी, यरनाळ, पांगिरे बी, बुदलमुख येथे अरिहंत उद्योग समूहामार्फत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांसाठी जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, ५ किलो जोंधळे, ५ किलो साखर,१लिटर तेल, चहापूड, साबण मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष आनंदा कुंभार, एल. जी. हजारे, श्रीकांत डाफळे, अरुण जाधव, आनंदा खराडे, सुनील हजारे, जितेंद्र देसाई, प्रकाश डाफले, ग्राम विकास अधिकारी माळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
यरनाळ येथील कार्यक्रम प्रसंगी दिनकर लकडे, निवृत्ती घाटगे, बाबुराव पोवार, किसन देसाई, नेताजी पोवार, संतोष पोवार, श्रावण चौगुले, किरण पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग डावरे, हनमंत पोवार, दीपक माने अरिहंत संस्थेचे शाखा व्यवस्थापक सुधीर पाटील यांच्यासह अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. संदीप संकपाळ यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta