Tuesday , July 21 2026
Breaking News

कोविड दरम्यान अनावश्यक चर्चा करु नका : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी

Spread the love


बेळगाव : मुख्यमंत्री बदलाविषयी घाईगडबड करीत असलेल्या भाजप नेत्यांना परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अथणी तालुक्यातील विविध ठिकाणी कालव्यांमध्ये पाणी पुरवठा करण्याच्या कामकाजाचा शुभारंभ केल्यानंतर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी पत्रकारांशी बोलत होते. सध्याच्या काळात कोविडची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आशा वेळी व्यर्थ चर्चा करण्यात अर्थ नाही असे सांगून त्यांनी येडियुराप्पांच्या नेतृत्व बदलाच्या फक्त अफवा असल्याचे सांगून त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.
सद्यस्थिती पाहता राज्यातील जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. ह्यासाठी सरकार प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विनाकारण चर्चा करुन समस्या निर्माण करु नका आणि आपापल्या क्षेत्रात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्रिय काम करा अशा कानपिचक्या दिल्या.
अथणी परिसरातील अनेक तलावांमध्ये आणि बंधाऱ्यांमध्ये कालव्यांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुकूल होणार आहे. त्याच बरोबर रब्बी पिकांसाठी हे पाणी फायदेशीर ठरणार आहे.
यावेळी भाजप प्रमुख श्रीपाल नायक, दत्त वस्तार, दिलीप लोंगर, शिवानंद दिवाणमळ , शिवानंद नायक, एस. आर. गुल्लप्पाण्णावर, अरुण बासिंगी, मुदुकांना शेगुन्सी, कुमार पाटील आणि पाटबंधारे विभागचे अधीक्षक अभियंता बी. आर. राठोड, कार्यकारी अधिकारी प्रवीण हुनसिकट्टी आणि इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर बायपासवर चिखलाचे साम्राज्य; २५ ते ४० दुचाकी घसरल्या, अनेक जखमी

Spread the love    बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर रस्ता बायपास परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *