निपाणी (वार्ता) : मुळगाव अक्कोळ (सध्या रा.निपाणी) येथील साहित्यिक आणि पत्रकार मनोहर हालाप्पा बन्ने (वय ७२) यांचे गुरुवारी (ता.३) निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ५) निपाणी विभागातील मराठी वृत्तपत्रातील माजी मुख्य प्रतिनिधी म्हणून सुपरिचित असणारे मनोहर बन्ने हे प्रथितयश लेखक, कवी आणि चांगले समीक्षकही होते. अस्सल ग्रामीण बाज असणाऱ्या …
Read More »ध्येय साध्य करण्यासाठी कणखर मानसिकता हवी
एस. बी. पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपण यशस्वी व्हावे, असे वाटत असते. मात्र त्यासाठी ध्येय निश्चितीची नितांत आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये निश्चितच काही कलागुण किंवा शक्तिस्थाने असतात. मात्र प्रत्येकाला त्याची जाणीव नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीआत्मपरीक्षण करावे. स्वतः ची शक्तिस्थाने ओळखून त्यांचा विकास करणे गरजेचे …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिर व्यवस्थापन समितीला निवेदन सादर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मराठा मंदिर येथील कार्यालयात पुन्हा कामकाज सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात मराठा मंदिर कार्यालय अध्यक्षांना एका निवेदनाद्वारे समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच कल्पना देण्यात आली. सदर निवेदन अध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी मराठा मंदिर व्यवस्थापकांकडे सुपूर्द करण्यात …
Read More »तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रतीक्षाच!
निवडणुका लांबल्याने इच्छुक अस्वस्थ; नगरपालिकेचा कारभारही प्रशासकाकडेच निपाणी (वार्ता) : मागील चार-पाच वर्षापासून वर्षापासून निपाणीतालुक्यासह जिल्ह्यातील तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकांची प्रतीक्षा सामान्य कार्यकर्त्यांना लागलेली आहे. या निवडणूका दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीआहे. त्यात राज्यातील सत्तांतर झाल्याने नेमके कोणाशी निष्ठावान रहावे, हा देखील प्रश्न कार्यकर्त्यांना पडत …
Read More »समाजातील गरजा शोधून सेवा पुरवा
माजी प्रांतपाल डॉ. व्यंकटेश मेतान; रोटरी, इनरव्हील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ निपाणी (वार्ता) : सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय पर्यावरण अशा विविध क्षेत्रात ११८ वर्षांपासून संपूर्ण जगात रोटरी ही एकमेव सामाजिक संस्था कार्यरत आहे आहे. युनोमध्ये मतदानाचा अधिकार असलेल्या रोटरी संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने सेवाभावी वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी …
Read More »बरगांव केंद्र पातळीवरील शालेय क्रिडा स्पर्धा तोपिनकट्टी येथे संपन्न
खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या पटांगणावर बरगांव केंद्र पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर व सौ. रुक्मिणी विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होत्या. यावेळी एसडीएमसी सदस्याकडून आमदार विठ्ठलराव हलगेकर, सौ. रुक्मिणी हलगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार …
Read More »भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा बेळगाव शाखा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बेळगाव : अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता काळी आमराई येथील सह्याद्री पतसंस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी शेकापच्या मध्यवर्ती समिती सदस्य ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ज्येष्ठ कार्यकर्ते नानू पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन …
Read More »देसूर ग्रा. पं. अध्यक्षपदी लक्ष्मी पाटील, उपाध्यक्ष काशव्वा कांबळे
बेळगाव : देसूर (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतच्या नूतन अध्यक्षपदी लक्ष्मी शिवाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी काशव्वा वैजू कांबळे यांची निवड झाली आहे. देसूर ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच सुरळीत पार पडली. यापैकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मी शिवाजी पाटील यांनी 15 पैकी 8 मते मिळवून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय संपादन …
Read More »हरियाणातील हिंसाचाराच्या निषेधार्थ विहिंप-बजरंग दलाची निदर्शने
बेळगाव : हरियाणातील नुह आणि अन्य ठिकाणी समाजकंटकांकडून केलेल्या हल्ले आणि हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आले. हरियाणातील नुह आणि अन्य ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला जात आहे. बस, सरकारी वाहनांवर …
Read More »“वार्ता”चा इम्पॅक्ट; खानापूर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डा बुजविला!
खानापूर (सुहास पाटील) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मोठ मोठे खड्डे पडल्याची बातमी “वार्ता”मधुन प्रसिध्द होताच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डा बुजविला. मात्र इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर लहान खड्डे आता मोठे होणार आहेत. आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta