Monday , August 24 2026
Breaking News

“बुरा ना मानो होली है” – यळेबैल येथे रंगपंचमी उत्साहात

Spread the love

 

बेळगांव (प्रतिनिधी) : “बुरा ना मानो होली है” असा आनंदी जल्लोष करत यळेबैल गावात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील युवक, लहान मुले तसेच ग्रामस्थांनी एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त केला.

सकाळपासूनच गावातील मुख्य चौकात, रंगांची उधळण सुरू होती. अबीर-गुलाल उधळत तरुणांनी डॉल्बीच्या तालावर नाचत सणाचा आनंद द्विगुणित केला. लहान मुलांनीही पिचकारी आणि रंगांनी खेळत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला.

ग्रामस्थांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत सण साजरा केला. व सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गावातील अनेक तरुण, नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रंगपंचमीच्या निमित्ताने गावात बंधुभाव आणि एकोप्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात ४३व्या कर्नाटक राज्य मिनी व सब-ज्युनियर ज्युदो स्पर्धेला सुरुवात

Spread the love  बेळगाव : कर्नाटक ज्युदो असोसिएशन, बंगळूर आणि बेळगाव जिल्हा ज्युदो संस्थेच्या संयुक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *