Monday , August 24 2026
Breaking News

मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने आता होऊ घातलेल्या दहावीच्या वार्षिक परीक्षेत मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन एका खास कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
यामध्ये बेळगाव शहरातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी, बेळगाव ग्रामीण भागातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी आणि खानापूर तालुक्यातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी,अशा एकूण तीस विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
तिन्ही विभागातील प्रथम क्रमांकासाठी दहा हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी सहा हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी चार हजार रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी तीन हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि सहाव्या ते दहाव्या क्रमांकासाठी एक हजार रुपये, अशी बक्षीसे देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई येथील आय.आय.टी.चे प्राध्यापक डॉ. गोपाळराव पाटील यांनी दिली आहे. यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, असे आवाहन त्यांनी केले असून अधिक माहितीसाठी डॉ. गोपाळराव पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

CEIRच्या मदतीने मार्केट पोलिसांनी शोधले १२३ हरवलेले मोबाईल

Spread the love  बेळगाव : नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *