Tuesday , June 16 2026
Breaking News

५ व्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धा : अॕस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न पूर्ण करु : खासदार शेट्टर

Spread the love

 

संगोळी रायण्णा व आर पी डी विजते : आरपीडी व संगोळी रायण्णा उपविजेते
बेळगाव : बेळगावमधून हाॕकीने देशाला ऑलिम्पिकवीर दिले असून हॉकी बेळगावचे अॕस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न माझ्या कार्यकिर्दीत पूर्ण करीन असे भरीव आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी आज आपल्या भाषणात दिले.
हॉकी बेळगावच्या वतीने पाचव्या आंतर महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यानी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत मुलांच्या गटातून संगोळी रायण्णा (२-०) तर मुलींच्या गटातून आरपीडी महाविद्यालय (१-०) विजयी ठरले तर मुलांच्या गटातून आरपीडी व मुलींच्या गटातून संगोळी रायण्णा उपविजेता संघ ठरला. शुभम नाईक (संगोळी रायण्णा) व नेत्रा गुरव (आरपीडी) यांची उत्कृष्ट खेळाडू निवड करण्यात आली. तर सायली पाटील, सावनी गोडबोले उगवते खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
विजयी महाविद्यालयीन संघांना प्रमुख पाहुणे खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक मच्छलवार हरिविजय, कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते चषके व भेटवस्तू देण्यात आले.
प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय देऊन हॉकी स्पर्धेची माहिती दिली. विजयी स्पर्धकांना मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी मण्णूरच्या वतीने संस्थापक चेअरमन स्व. आर. डी. चौगुले यांच्या स्मरणार्थ चषके पुरस्कृत करण्यात आली होती.
यावेळी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रकाश चाळके, सुरेश पोटे, दयानंद कारेकर, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे, गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, डाॅ मल्लिकार्जुन थाल्ला, संतोष दरेकर, सविता वेसणे, सविता हेब्बार, आशा होसमणी, अश्विनी बस्तवाडकर, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मंकाळे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या २२ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *