Monday , August 24 2026
Breaking News

तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा (निरोप) समारंभ

Spread the love

 

खानापूर : आज दिनांक 07 मार्च 2026, श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा 2025-2026 बॅच सदिच्छा (निरोप) समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. भैरु य. शहापूरकर हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून मा. वाय. एन. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पि. के. गोरे यांनी केले. त्यांनी शाळेच्या प्रगतीबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माया घाटगे यांनी अतिशय सुंदर आणि प्रभावीपणे केले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत, शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांबाबत तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व लक्षात ठेवावे याबाबत मान्यवरांनी मौल्यवान विचार मांडले.
या प्रसंगी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच एसडीएमसी समितीचे सर्व सभासद, शिक्षकवृंद आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सर्व उपस्थितांनी शाळेच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत उपयुक्त असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद व माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षक भरतीत मराठी माध्यमाच्या १९५ जागांचा तातडीने समावेश करा : आमदार विठ्ठल हलगेकर यांची मागणी

Spread the love    खानापूर : कर्नाटकातील सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत रिक्त असलेल्या मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *