Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

  मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला होता. अखेर दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपावली आहे. मात्र विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे. राष्ट्रवादी …

Read More »

हरियाणात दोन गटात झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डचा मृत्यू; परिस्थिती नियंत्रणात, जिल्ह्यात कलम 144 लागू

  मेवत : हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातील नूहमध्ये जातीय तणावाच्या प्रकरणी परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे. विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या जलाभिषेक यात्रेच्या दरम्यान ह प्रकार घडला आहे. जलाभिषेक रोखण्याचा प्रयत्न करणारा जमाव आणि यात्रेतील भाविक यांच्यात झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुधीर चव्हाण यांची निवड

  बेळगाव : तत्कालीन बार असोसिशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाल्याने बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष पद काही दिवसापासून रिक्त होते. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीने नवीन अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ऍड. सुधीर चव्हाण यांची निवड केली. जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या …

Read More »

समृद्धी महामार्गावर ठाण्यात मोठी दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, 16 मजुरांचा मृत्यू

  शहापूर : काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या आठवणी ताज्या असताना समृद्धी महामार्गावर पुन्हा मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळली. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यरात्री शहापूर …

Read More »

ग्राम वन केंद्रांच्या ऑपरेटर्सची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी अत्यल्प रक्कम देऊन त्यावरही जीएसटी आकारण्यात येत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्राम वन केंद्रांच्या ऑपरेटर्सनी केंद्र बंद करून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. राज्यातील गृहलक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ग्रामवन केंद्रांच्या ऑपरेटर्सना प्रति नोंदणीसाठी 20 रुपये देण्यात येतात. मात्र त्यातील 8 रुपये जीएसटी, टीडीएससाठी कपात …

Read More »

खानापूर वकील संघटनेच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांचा सत्कार

  खानापूर : खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा सत्कार सोहळा सोमवारी दि. ३१ रोजी खानापूर कोर्टातील वकील संघटनेच्या कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी होते. व्यासपीठावर ऍड. एच. एन देसाई, ऍड. केशव कळेकर, ऍड. सुरेश भोसले, ऍड. अनंत देसाई, ऍड. …

Read More »

उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी दाम्पत्याची बिनविरोध निवड

  बेळगाव : उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी दाम्पत्याची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असल्याने मथुरा बाळकृष्ण तेरसे यांची अध्यक्षपदी तर मथुरा यांचे पती बाळकृष्ण खाचू तेरसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यात असलेले उचगाव गाव आहे. ८००० जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात ग्रामपंचायत निवडणूक पार …

Read More »

क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णांची मूर्ती चांगल्या जागी बसवा!

  बेळगाव : मच्छे (ता. बेळगाव) येथे नगरपंचायतीसमोरच्या गावातील सोसायटीच्या जागेत ५ जुलै रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही मूर्ती सदर जागेतून हटवून मोक्याच्या आणि चांगल्या जागेत बसवण्यात यावी, अशी मागणी समस्त मच्छे गावकऱ्यांनी केली आहे. आज नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांना याबाबत …

Read More »

धबधब्याजवळ अधिकाऱ्यांची ओली पार्टी : उर्वरित चार कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  बेळगाव : बटावडे धबधब्याजवळील जंगल परिसरात दारूबंदीचे उल्लंघन करून मौजमजा केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य चौघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटनास बंदी असतानाही बटावडे धबधब्याजवळील वनपरिक्षेत्रात अधिकारी व डॉक्टरांच्या गटाने ओली पार्टी केल्याप्रकरणी जांबोटी वनपरिक्षेत्रात चार जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

पर्यटनास निर्बंध असताना अधिकाऱ्यांनीच केली धबधब्याजवळ ओली पार्टी!

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले असताना अधिकाऱ्यांनीच ओली पार्टी केल्याची घटना जांबोटीजवळच्या बटावडे धबधब्यावर घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हेस्कॉमचे कांही अधिकारी आणि डॉक्टरांच्या एका गटाने जांबोटीजवळील बटावडे धबधब्याजवळ तंबू ठोकून मोठ्या प्रमाणात पार्टी करून मौजमजा केल्याची घटना सर्वत्र चर्चेत आहे. पावसामुळे धबधबा आणि …

Read More »