Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

येत्या ५ दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

  बेंगळुरू : नैऋत्य मोसमी पावसाचा जोर आजपासून राज्याच्या किनारी भागासह अंतर्गत भागात वाढण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या किनारपट्टी आणि उत्तरेकडील अंतर्गत भागासाठी आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर दक्षिणेकडील अंतर्गत भागासाठी पिवळा अलर्ट …

Read More »

गोकाक धबधब्यावर जाण्यास निर्बंध; पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले

  बेळगाव : गोकाक येथील धबधबा व परिसर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. पावसाळ्यात येथे अक्षरशः जत्रा भरते. येथील मंत्रमुग्ध करणारे नैसर्गिक वातावरण लोकांना खेचून आणत आहे. या जबरदस्त ‘लोकेशन्स’वर फोटो न काढले तरच नवल. धबधब्याच्या कड्याजवळ आणि टोकावर धोकादायक स्थितीत सेल्फी व फोटोसेशन केले जात आहे. मात्र, असे करणे …

Read More »

गुजरातमधील इस्कॉन पुलावर भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 15 पेक्षा अधिक लोक जखमी

  अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये 15 ते 20 जण जखमी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. माहितीनुसार, या इस्कॉन पुलावर मध्यरात्री एक चारचाकी आणि डंपरची जोरदार धडक झाली. या अपघात पाहण्यासाठी आजूबाजूला बरीच गर्दी …

Read More »

खानापूर तालुक्यात ५० नवीन मतदान केंद्रे वाढविण्यासंदर्भात तहसील कार्यालयात बैठक संपन्न

  खानापूर : खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे. तसेच विस्तारानेही मोठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात घनदाट जंगल त्यातच आठ ते दहा किलोमीटर अंतरावर खेडी. त्यामुळे जंगलातून चालत जाऊन दुसऱ्या गावच्या मतदान केंद्रावर मतदान करताना मतदारांचे हाल होतात. अनेक वयोवृध्द मतदानापासून वंचित राहतात. ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार प्रकाश …

Read More »

कोगनोळीकरांचा बंदला शंभर टक्के प्रतिसाद

सर्व व्यवहार बंद : रस्त्यावर शुकशुकाट कोगनोळी : अखिल भारतीय जैन समाजाने गुरुवार तारीख 20 रोजी भारत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोगनोळी मधील सर्व समाजाने गुरुवारी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून भारत बंद यशस्वी करावा असे जाहीर आवाहन समस्त जैन समाज यांच्यावतीने केले होते. कोगनोळीकरांनी जैन समाजाने पुकारलेल्या …

Read More »

दोषींना माफी नाही : मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान मोदींची स्‍पष्‍टोक्‍ती

  नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडली. त्यानंतर दोन महिने उलटूनही आरोपींना अटक झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधारा पाण्याखाली

गडहिंग्लज : गेल्या तीन-चार दिवसांपासून पश्चिम घाटासह आजरा, गडहिंग्लज तालुक्यांत जोरदार पाऊस सुरु असून हिरण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. आज (दि. २०) सकाळी गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील निलजी बंधारा पाण्याखाली गेला असून, या बंधार्‍यावरुन होणारी वाहतूक बंद झाली आहे. काल (दि. १९) सायंकाळी पश्चिमेकडील ऐनापूर बंधार्‍यावर पाणी …

Read More »

आजपासून खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होऊन बरेच दिवस उलटून गेले. मात्र निवडणूक कधी होणार याकडे ग्राम पंचायतीच्या सदस्यांचे लक्ष लागून आहे. अखेर आज गुरूवार दि. २० पासुन खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीला मुहूर्त मिळाला. खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम …

Read More »

प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळली; 8 जण मृत्युमुखी

  रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळली आणि पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं. या गावात 45 ते 50 घरांची वस्ती आहे, यातील 30 ते 40 घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली …

Read More »

चांद शिरदवाड ग्रामपंचायत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील

  उपाध्यक्षपदी शितल लडगे यांची बिनविरोध निवड निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड ग्राम पंचायतच्या झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री किरण पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भाजपाचे शितल रामगोंडा लडगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवडणूक करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून महातेंश हरोले यांनी काम पाहिले. निवडी नंतर पदाधिकाऱ्यांच्या समर्थकानी फटाके …

Read More »