Monday , August 24 2026
Breaking News

बी. के. हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ

Spread the love

 

बेळगाव : येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चित्रकला शिक्षक श्री. प्रमोद चिदंबर जोशी हे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एन. जोशी होते. पाहुण्यांचा स्वागत व परिचय श्री मोहिते सर यांनी केले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे संयोजक श्री. भास्करी सर व वरिष्ठ शिक्षक श्री युवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. प्रमोद जोशी सरांनी मुलांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. “जीवनात यशस्वी होण्यासाठी, ध्येय प्राप्तीसाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. त्यासाठी दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण महत्त्वाच आहे.”
असे ते म्हणाले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. युवराज पाटील, राम गुरव व एस एन जोशी सरानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्रीमती दिपम पाटील यानी केले. आभार श्री स्वामी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातात आमदार अभय पाटील जखमी

Spread the love    दिल्ली : बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या कारला रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *