Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा शरद पवारांना प्रस्ताव, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियेनंतर मोठ्या उलथापालथी?

  मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांना दिला,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसंच शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचा विचार करुन मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी कोणतंही भाष्य केलं …

Read More »

सुनेचा छळ केल्याच्या आरोपातून सासूची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : सुनेला शारिरीक व मानसिक त्रास करून माहेरीहून पैसे घेऊन ये म्हणून तगादा लावत मारहाण करुन घरातून हाकलल्याच्या प्रकरणातून साक्षीदारातील विसंगतीमुळे आरोपी सासूची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतची माहिती अशी की, किणये (ता. जि. बेळगांव) येथील दोन अपत्ये असलेल्या अनुराधा अमोल डुकरे (वय …

Read More »

‘गृहलक्ष्मी’साठी 19 जुलैपासून अर्ज दाखल प्रक्रियेस प्रारंभ

  बेंगळुरू : मुख्य गृहिणीच्या खात्यात मासिक 2000 रुपये अनुदान देणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेसाठी 19 जुलैपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होणार आहे. बेंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या की, गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज सादर करणे 19 जुलैपासून सुरू होईल. कर्नाटक वन, ग्राम वन, बापूजी …

Read More »

प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडणे आवश्यक

  युवा नेते उत्तम पाटील : निपाणीत मान्यवरांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात समाजासाठी काही तरी करण्याची भावना हळूहळू कमी झाली आहे. ही दुर्दैवी पण वस्तुस्थिती आहे. समाजात जन्म घेतल्यानंतर त्याचे ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून काम झाल्यास अपेक्षित असलेला सामाजिक विकास घडेल, असे मत बोरगाव …

Read More »

तलाठी भरतीतील सीमाभागावरील अन्याय दूर करा

  निपाणी म. ए. युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन; पोर्टलमध्ये सीमाभागाचा समावेश व्हावा निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी ‘गट क’ विभागातील एकूण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून २६ जूनपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना सीमावासियांना तांत्रिक अडचणी जाणवत असून या …

Read More »

प्रख्यात गायक पंडित कैवल्य कुमार यांच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध!

  बेळगाव : के एल एस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या भक्तीसुगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राग आणि विविध भजने सादर करून कैवल्य कुमार यांनी आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित कैवल्यकुमार यांनी आपल्या मैफिलीची सुरुवात रूपक तालातील गौड मल्हार रागाने …

Read More »

मित्रांनीच केला मित्राचा खून!

  बेळगाव : हुंचेनहट्टी येथे काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेली अरबाज रफिक मुल्ला या युवकाच्या खुनाची घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याचे स्पष्ट झाले असून मित्रांनीच अरबाजला पार्टीसाठी नेऊन त्याचा खात्मा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. प्रसाद नागेश वडर (रा. जन्नतनगर, पिरनवाडी) आणि प्रशांत रमेश कर्लेकर (रा. सिद्धेश्वर गल्ली, …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या डाफळेंचा काँग्रेस प्रवेश

  अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी, बुदलमुख, पांगिरे-बी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता.२०) निवडणूक होत आहे. अशावेळी अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या रेश्मा संदीप डाफळे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम व युवा …

Read More »

गर्लगुंजीत शाॅर्टसर्किटमुळे आग लागलेल्या फळ बागेच्या नुकसान भरपाईची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर ३१६ मधील दोन एकर जमिनीतील नारायण दत्ताजीराव पाटील यांच्या मालकीच्या फळ बागेला शाॅकसर्किटमुळे आग लागून लाखोचे नुकसान झाले. यासंदर्भात बागायत खात्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता. बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी हेस्काॅम खात्याकडे बोट करून आपली जबाबदारी झटकली आहे. याबाबत मिळालेली माहिती …

Read More »

जांबोटी क्राॅसवरील जागेवर तहसील कार्यालयाने दाखवला हक्क

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जत -जांबोटी महामार्गावरील जांबोटी क्राॅस येथे असलेल्या १६ गुंठे जमिनीवर खानापूर तहसील कार्यालयाने आपला हक्क बजावत तारेचे कुंपण घालून जागेचे संरक्षण केले. गेल्या कित्येक वर्षांपासून जत -जांबोटी महामार्गावरील जांबोटी क्राॅसवर अनेक गाळे चालु होते. मात्र गेल्या वर्षी महामार्गावरील रस्त्याचे रूंदीकरण, गटारी व डांबरीकरण करण्याच्या …

Read More »