Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार

बिजगर्णी, बेळवट्टी विभाग समिती कार्यकर्त्यांचा मेळावा बेळगाव : कन्नडसक्तीच्या वरवंट्याखाली आज मराठी भाषा आणि संस्कृती धोक्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच विजयी करून मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा निर्धार बिजगर्णी व बेळवट्टी ग्रामपंचायत क्षेत्रातील आठ गावातील समिती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. गोडसे काजू फॅक्टरीच्या आवारात झालेल्या या …

Read More »

‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडे किणये पंचायतविरूध्द तक्रार

  बेळगाव : बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, बामणवाडी गावातील रोजगाराचे (मनरेगा) काम मागणाऱ्या महिलांची ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडे किणये पंचायतविरूध्द तक्रार – किणये ग्रामपंचायतीमधील बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी व बामणवाडी गावातील मनरेगा कामगारांना पंचायतीमार्फत वर्षाला 100 दिवस गेल्या कित्येक वर्षांपासून कधीच रोजगाराचे काम मिळालेले नाही. येथील काही …

Read More »

कर्नाटकातील भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा लाचप्रकरणी अटकेत

  बंगळुरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना सोमवारी (दि. २७ मार्च) तुमाकुरू येथील क्याथासांद्र टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली. भाजपचे आमदार मादल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदाल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी २ …

Read More »

खासदारकीनंतर आता ‘सरकारी निवारा’ही जाणार; राहुल गांधी यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. नोटीसनुसार, …

Read More »

विरुपक्षालिंग समाधी मठ गोशाळेच्या चाऱ्याला आग लावणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी

  निपाणी : अज्ञात समाजकंटकाकडून श्री विरुपक्षालिंग समाधी मठ गोशाळेच्या चाऱ्याला आग लावण्यात आली. अशा समाजकंटकाला शोधून कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने बसवेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय आनंदराज कॅरीकट्टी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निपाणी तालुक्यामधील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कायदेशीर …

Read More »

वडगाव भागातील विहिरींना ड्रेनेजमिश्रीत पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  बेळगाव : वडगावसह उपनगरातील विहिरीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात सर्वत्र स्मार्टसिटी अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नवीन रस्ते करणे, डांबरीकरण, सिमेंटिकरण, गॅस पाईपलाईन अशी विविध कामे जोरात सुरू आहेत. त्या अनुषंगाने सर्वत्र रस्त्याचे खोदकाम चालू आहे. अश्यावेळी अनेक ठिकाणी ड्रेनेज पाईपच्या गळतीमुळे …

Read More »

एपीएमसी आणि शहापूर पोलीसांच्या संयुक्त कारवाईत 1.23 लाखाची दारू जप्त

  बेळगाव : एपीएमसी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कार गाडीसह 1 लाख 23 हजार 933 रुपये किमतीची दारू जप्त करण्याबरोबरच एकाला अटक करण्यात आल्याची घटना काल रविवारी जुने बेळगाव – येडीयुरप्पा मार्गावर घडली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव अनिलकुमार लवप्प हज्जी (वय 53, मूळ रा. हरिजनवाडी …

Read More »

किरण जाधव यांनी घेतली येडीयुराप्पा यांची भेट

  बेळगाव : बेळगावचे धडाडीचे मराठी नेते आणि कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी शुभाशीर्वादाच्या स्वरूपात पाठिंबा देऊन सुयश चिंतले आहे. राज्यातील मराठी समुदायाच्या उत्कर्षासाठी झटणारे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील मराठा समाजाचे युवा नेते किरण …

Read More »

राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरु करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  मुंबई : राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजप आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. याचदरम्यान आज …

Read More »

मेणसी गल्लीत शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग; लाखोचे नुकसान

  बेळगाव : शॉर्ट सर्किटमुळे मेणसी गल्ली येथील उत्तम नोव्हेल्टी या दुकानाला आग लागून स्टेशनरीसह सजावटीचे साहित्य वगैरे जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. आगीमुळे नुकसान झालेले उत्तम नोव्हेल्टी हे दुकान महिपाल सिंग यांच्या मालकीचे आहे. शहरातील मेणसी गल्ली येथे मुख्य रस्त्याला लागून आत …

Read More »