खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात गांजा विक्रीच्या घटना सतत घडत आहेत. याची खानापूर पोलिसांनी दखल घेऊन शुक्रवारी दि. १७ राजी सायंकाळी ६.४५ वाजता खानापूर शहरापासून जवळ असलेल्या रूमेवाडी क्राॅसजवळ मन्सूर आप्पालाल कमानदार वय ३९, रा. पारिश्वाड (ता. खानापूर) व रामचंद्र नागाच्या शिंदे वय ६३, रा. लक्केबैल (ता. खानापूर) यांच्याकडून …
Read More »खानापूर तालुका समितीच्या कार्यकारिणीसाठी 175 जणांची दुसरी यादी जाहीर
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनानुसार नवीन विस्तृत कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे आपला सहभाग दर्शविला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात नवचैतन्य पसरले आहे. आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकरिणीची 175 जणांची दुसरी यादी नुकताच जाहीर झाली आहे. दत्तू गोपाळ कुट्रे हालसाल, रमेश वसंत देसाई इदलहोंड, शंकरराव पाटील …
Read More »१५ टक्के वेतनवाढ परिवहन कर्मचाऱ्यांनी फेटाळली; २१ पासून बेमुदत संपाचा निर्णय कायम
बंगळूर : राज्य सरकारने १५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव धुडकावून लावून परिवहन कर्मचाऱ्यांनी २१ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. गुढीपाडवा सणाच्या काळात संप केल्यास त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसू शकतो. वेतन सुधारणेसह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी चार परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्य …
Read More »दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी करण्याचा वाघवडेवासियांचा निर्धार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने येथे रविवार दि 19 मार्च रोजी येळ्ळूर येथील राजहंसगडावर होणाऱ्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा दुग्धाभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करण्याचा निर्धार वाघवडे (ता. जि. बेळगाव) येथे आयोजित जनजागृती सभेमध्ये व्यक्त करण्यात आला. येळ्ळूर राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा दुग्धाभिषेक सोहळ्या …
Read More »विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाकडून कोडणीत चिकोत्रा नदी स्वच्छता मोहीम
कोडणी : कोडणी-चिखली आंतरराज्य पूलानजिक मोठ्या प्रमाणात चिकोत्रा नदीपात्रामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, बाटली, कचरा, पाला पाचोळा साचून राहिला होता. यामुळे मोठी दुर्गंधी येत होती. यामुळे आजूबाजूच्या नागरीकांना याचा त्रास होत होता. तसेच यामुळे नदीचे पाणी दुषीत होत चालले होते. दूषित पाण्यामुळे जनावरे मोठ्या प्रमाणात आजारी पडत होते. यांची माहिती मिळताच …
Read More »उचित ध्येय हेच यशाचा मार्ग दाखविते
प्रा. रवींद्र चव्हाण; कुर्ली हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : सध्या जगाची वाटचाल ही स्पर्धात्मक आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धजावलेला आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. स्पर्धा केल्याशिवाय यश देखील मिळणार नाही. परंतु स्पर्धा करीत असतांना सामाजीक हिताचा देखील विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे …
Read More »पाण्याकडे दुर्लक्ष करून मुलाच्या नावे निविदा : विलास गाडीवड्डर
निपाणी (वार्ता) : विद्यमान नगराध्यक्षांना अडीच वर्षात शहरवासीयांना सुरळीत पाणी देता आले नाही. आपल्या मुलाला मात्र टेंडर मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. पाण्यासाठी काढलेल्या मोर्चाला दिशाभूल समजत असाल तर निदान राजकीय फायदा घेण्यासाठी तरी जनतेला सुरळीत पाणी द्या, असे आवाहन विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांनी दिले. विरोधी घटाने घेतलेल्या …
Read More »नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : नगराध्यक्ष जयवंत भाटले
निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेचे काम २००९ पासून आजपर्यंत रेंगाळले आहे. याला यापूर्वीचे सभागृह जबाबदार आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत त्याकडे लक्ष न देता विरोधक पाण्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केला. नगरपालिकेत सत्ताधरी गटाची पत्रकार बैठक पार पडली यावेळी ते बोलत …
Read More »युवाशक्तीच घाणेरड्या राजकारणाला मुठमाती देईल : युवा नेते उत्तम पाटील
निपाणीत रविवारी युवक मेळाव्याचे आयोजन निपाणी(वार्ता): आजचे तरुण हे उद्याचे भविष्य आणि देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. मी आपल्यातील एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. तरीही अडचणी आणल्या जात आहेत. अशा या घाणेरड्या राजकारणाला ही युवाशक्तीच क्रांती करून मूठमाती देईल, असा ठाम विश्वास …
Read More »कोगनोळीत ईव्हीएम मशिनची जनजागृती
कोगनोळी : येथील ग्राम पंचायत कार्यालयात सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मतदान मशिनबद्दल जनजागृती केली. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा वनिता खोत तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते. उज्वल शेवाळे यांनी स्वागत तर प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रास्ताविक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta