Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

सुमंगलम-पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल

    अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामी :सिद्धगिरी मठ येथे होणार भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : कणेरी येथील सिद्धगिरी मठाला १३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभली आहे. येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलम पंच महाभूत लोकोत्सव २० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आल्याची माहिती सिद्धगिरी …

Read More »

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षण

  येळ्ळूर :  येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे यावर्षीचे मुख्य आकर्षण सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या असणार आहेत. साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे. छोट्या पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे” ही …

Read More »

समिती शिष्टमंडळाने घेतली खा. सुप्रिया सुळे यांची भेट

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने काल सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. यावेळी येत्या मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी नियोजित ‘मुंबई चालो’ मोर्चा आणि महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादा संदर्भातील विविध ताज्या घडामोडी आणि बेळगाव शहरातील महिला मेळाव्याबद्दल चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र …

Read More »

घराचे छत अंगावर कोसळून वृद्ध महिला ठार

  सौंदत्ती तालुक्यातील घटना सौंदत्ती : घराचे छत अंगावर कोसळल्याने मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. करिकट्टी (ता. सौंदत्ती, जि.बेळगाव) येथे आज मंगळवारी सकाळी ७.३० वा.सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. शांतव्वा शिवमूर्तय्या हिरेमठ (वय ६०, रा. साकीन करिकट्टी, ता. सौंदत्ती) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद सौंदत्ती …

Read More »

शिवचरित्रावर आधारित भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा 26 फेब्रुवारी रोजी

  बेळगाव : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान चरित्राचा सर्वांमध्ये प्रसार व प्रचार होण्याकरिता दरवर्षीप्रमाणे शहरातील भगवे वादळ युवक संघातर्फे येत्या रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत शिवचरित्रावर आधारित भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा -2023 येथे आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी …

Read More »

भाजपा सर्वच आघाड्यांवर अपयशी : एस. एम. बेळवटकर

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेसमोर महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न आ वासून उभे आहेत, असे दक्षिण मतदार संघातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सातेरी बेळवटकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष परशुराम ढगे आणि ग्रामिण ब्लॉक अध्यक्ष किरण पाटील …

Read More »

गोकाक शहरात मराठा समाजाच्या विकास कामांसाठी जागा उपलब्ध करून देणार : रमेश जारकीहोळी

  बेळगाव : गोकाक शहरात मराठा समाजाच्या विकास कामांसाठी 6 गुंठे जागा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा व पत्र दिल्याबद्दल सकल मराठा समाजाने आमदार रमेश जारकीहोळी यांचे अभिनंदन केले. गोकाक येथे रविवारी झालेल्या कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाच्या बैठकीत रमेश जारकीहोळी यांनी ही घोषणा केली व पत्र दिले. मराठा समाजाचे श्री …

Read More »

सहाय्यक आयुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या पतीची आत्महत्या

  खानापूर : बेळगावच्या सहाय्यक आयुक्त रेश्मा तालिकोटी यांचे पती जाफर पिरजादे यांनी आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. जाफर पिरजादे हे अनेक वर्षांपासून बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणून सेवा बजावत होते. आज दुपारी त्यांच्या आत्महत्येची खबर सर्वत्र पसरली. एपीएमसी पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. सध्या ते प्रथम दर्जा …

Read More »

मुंबई येथील धरणे आंदोलन यशस्वी करावे

  बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीची बैठक संपन्न बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 28 फेब्रुवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनचा नारा दिला आहे. हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी, बेळगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना उपस्थित करण्यासाठी तालुक्यामध्ये जनजागृती करावी व हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन ऍड. सुधीर …

Read More »

क्रुझर व दोन दुचाकींचा भीषण अपघात; दोन ठार तर दोन गंभीर

  रामदुर्ग : क्रुझर व दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. कडलीकोप्प (ता. रामदुर्ग जि. बेळगाव) नजीक हा अपघात झाला. महानिंग नांजप्पा अचमट्टी (वय २५ रा. भाग्यनगर रामदुर्ग) रफिक चलवादी (वय २६, रा. मड्डीगल्ली) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर उन्नीस मुहम्मद …

Read More »