बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 11 तर भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. अनेक मतदारसंघांचे निकाल यापूर्वीच जाहीर झाले असून काही मतांची मोजणी सुरू आहे. अथणी, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, सौंदत्ती, कित्तूर, रामदुर्ग, कागवाड, चिक्कोडी, यमकनमरडी, बैलहोंगल आणि कुडची येथे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. बेळगाव दक्षिण, खानापूर, …
Read More »कर्नाटकमधील पराभवाने भाजपच्या ‘मिशन 2024’ ला बसणार धक्का?
बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागणार आहेत. मात्र त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची (भाजप) चिंता वाढवली आहे. एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बहुतांशी एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 110 ते 140 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. …
Read More »खानापूर तालुक्यात आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी दि. १३ रोजी होणार आहे. यासंदर्भात खानापूर मतदार संघात खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी दि. १३ रोजी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत १४४ अन्वये दारूबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तेव्हा रॅली, प्रतिकृती जाळणे, लाऊडस्पीकरचा वापर करणे सक्त मनाई आहे. आदेशाचे …
Read More »उद्या दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील : जिल्हाधिकारी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी केंद्र असलेल्या टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयात जमा करण्यात आली असून उद्या शनिवारी दुपारपर्यंत सर्व मतदार संघाचे निकाल जाहीर होऊ शकतील, अशी शक्यता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बोलून दाखविली. आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये …
Read More »थांबलेल्या दोन कंटेनरसह १६ कार जळून खाक; कोट्यावधीचे नुकसान
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना निपाणी : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या हिटणी फाटा येथे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या धाब्यावर थांबलेले होते. अचानपणे दोन कंटेनरना आग लागली. या आगीत कंटेनरमध्ये असलेल्या 16 कार कारसह दोन कंटेनर जळून खाक झाले आहे. यामध्ये कोट्यावधीची हानी झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही …
Read More »ओळखपत्र उपलब्ध न झाल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित
बेळगाव : भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला वयाच्या 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिलेला आहे. तो हक्क बजावत असताना मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. कालच कर्नाटकात विधानसभा निवडणुका पार पडल्या. मात्र बरेच मतदार या निवडणूक ओळखपत्रापासून वंचित राहिलेले आहेत. नवीन मतदार ओळखपत्र किंवा मतदान ओळखपत्रावरील दुरुस्तीसाठी पुन्हा मागविण्यात …
Read More »खानापूर मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार!
तालुक्यातील जनतेतून चर्चा खानापूर : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडावली. तसे जनतेचे लक्ष निवडणुकीच्या निकालाने लागून राहिले आहे. उद्या शनिवारी दि. १३ रोजी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराचा निकाल लागणार. खानापूर मतदार संघातून कोण निवडून येणार यावर तर्क वितर्क तालुक्यातील खेडोपाडी तसेच खानापूर शहरात मोठ्या उत्साहाने चर्चा केली जात आहे. …
Read More »सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ
परभणी जिल्ह्यातील घटना परभणी : सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री सेप्टिक टँक स्वछ करण्यासाठी कामगार आत उतरले होते. यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. …
Read More »कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर सट्टेबाजांचा अंदाज!
कोणत्या पक्षाच्या विजयाची भविष्यवाणी? बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान झालं. उद्या म्हणजे 13 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता असतानाच सट्टेबाजांनी काँग्रेसवर पैसा लावला आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी बुधवारी मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस …
Read More »शिंदेंची गटनेतेपदाची निवडही बेकायदेशीर; कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचा मोठा दावा
मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर गुरूवारी संपली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत ठेवता आली असती, असे सांगून सोळा आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta