Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

कथित सीडी प्रकरणास डी. के. शिवकुमार हेच जबाबदार; रमेश जारकीहोळी यांचा आरोप

  बेळगाव : गेल्या दीड वर्षांपासून माझ्या विरोधात सातत्याने षडयंत्र केले जात आहे. कथित सीडी प्रकरणाव्दारे माझे वैयक्तिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्वा मागे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार हेच कारणीभूत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील बडे राजकारणी तसेच अधिकाऱ्यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे काम केले जात …

Read More »

फेब्रुवारीत भरवणार कुंभार समाजाचा मेळावा

  संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाच्या बैठकीत निर्णय खानापूर : दर पाच वर्षांनी खानापूर तालुका पातळीवर संत गोरा कुंभार समाज विकास मंडळातर्फे महामेळावा फेब्रुवारीत भरवण्याचा निर्णय रविवारी झालेल्या वार्षिक बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे आयोजन फुलेवाडी येथील आयोध्या नगरमध्ये करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भैरू कुंभार होते. बैठकीच्या …

Read More »

कोगनोळीच्या चिमुकल्या आराध्याला महाराष्ट्र शासनाचा बालक्रीडा गौरव पुरस्कार

  कोगनोळी : येथील बाळासाहेब पाटील बनाप यांची नात आराध्या पद्मराज पाटील या चिमुकल्या मुलीला कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा बाल क्रीडा गौरव पुरस्कार देऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शाहू स्टेडीयम येथे कोल्हापूर जिल्ह्यातील “कला, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये …

Read More »

खानापुरात मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय

  खानापूर : मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे जतन करणारी संस्था म्हणजे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागील बारा वर्षांपासून मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करून …

Read More »

शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी पंचत्वात विलीन

  बेळगाव : हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या टकरीत शहीद झालेले बेळगावचे सुपुत्र विंग कमांडर हनुमंतराव सारथी पंचत्वात विलीन झाले. अमर रहे, अमर रहे हनुमंतराव सारथी अमर रहे अशा जयघोषात, बेळगावातील गणेशपूरमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यप्रदेशमधील मुरेना जिल्ह्यात सुखोई आणि मिराज विमानांच्या सरावावेळी झालेल्या धडकेत बेळगावचे सुपुत्र विंग …

Read More »

ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन; पोलिस अधिकाऱ्यानं केला होता गोळीबार

  ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते. …

Read More »

भारतीय मुलींची कमाल! फायनलमध्ये इंग्लंडला मात देत अंडर 19 विश्वचषकावर कोरलं नाव

  भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर भारतीय संघानं नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं आहे. आधी गोलंदाजी निवडून भारतानं संपूर्ण …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हळदीकुंकू समारंभास महिलांची लक्षणीय उपस्थिती

    बेळगाव : सीमालढा हा मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आहे. तेव्हा आम्हाला न्याय मिळेपर्यंत लढणे हे आमचे कर्तव्य आहे. सीमाभागातील महिलांना मिक्सर, ताट, कुकर, साडी देऊन दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न राष्ट्रीय पक्षाने चालवला आहे तो येणाऱ्या निवडणुकीत महिलांनी हाणून पाडला पाहिजे व महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात साजरा

  बेळगाव : शनिवार दि. 28 जानेवारी 2023 रोजी श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गोकुळ प्रदेश मटृद महिला स्व-सहाय संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर व राजहंस गल्लीचे ज्येष्ठ पंच श्री. ज्योतिबा …

Read More »

अखेर ठरलं; शिवसेनेचे बळ वाढणार! दिडशेहून जास्त कार्यकर्ते बांधणार मंगळवारी ‘शिवबंधन’

  मंगळवारी ‘शिवबंधन’, कार्यकर्त्यांना दिली जाणार पक्षनिष्‍ठेची प्रतिज्ञा बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या सीमाप्रश्नाला बळ मिळावे या उद्देशाने शिवसैनिकांना शिवबंधन बांधून मशाल हाती देण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल मंगळवारी शहरातील …

Read More »