Tuesday , April 21 2026
Breaking News

ऍड. अमर यळ्ळूरकर यांचा प्रचाराचा झंझावात

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 27 रोजी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांचा प्रचार शहरातील व्यापारी भागात करण्यात आला. अनेक वर्षानंतर बेळगावच्या शहरी भागामध्ये समितीमय वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. बेळगावच्या मूळ 18 गल्ल्यामधील होणाऱ्या या प्रचारामुळे मराठी लोकांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. महिला, युवक कार्यकर्ते यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रचारामध्ये आणखीन रंगत येत आहे. आझाद गल्ली, मेणशी गल्ली, टेंगिनकर गल्ली, माळी गल्ली, कामत गल्ली आदी प्रमुख गल्ल्यांमधून निघालेल्या प्रचार फेरीमुळे पुन्हा एकदा समितीची मशाल उजळलेली दिसत होते. गेल्या पंचवीस वर्षात बेळगावच्या शहरी भागातून समितीचा आमदार निवडून आला नाही त्याची कसर यंदाच्या निवडणुकीत भरून काढण्याचा निर्धार जनतेने केलेला दिसतो. या प्रचार फेरीदरम्यान महिला व युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या प्रचार फेरीमध्ये अशोक बेळगुंदकर, अमित मेणसे, विजय काकतकर, दुर्गेश घसारी, दीपक गायकवाड, भरत कित्तुरकर,  राजश्री हलगेकर, ऍड. प्रफुल टपालवाले, शिवाजी हलगेकर, सुनील ढमाले यांच्यासह समितीचे जेष्ठ कार्यकर्ते आजी-माजी नगरसेवक महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *