Monday , September 21 2026
Breaking News

सीमाभागात महात्मा जनआरोग्य योजना अंमलबजावणी नाहीच

Spread the love

 

बेळगाव : फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमावासीयांनी मुंबई येथील आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात इतर मागण्यांसह सीमावासीयांना सर्व महाराष्ट्र राज्याच्या शासकीय सोयी सुविधांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी देखील केली गेली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी अधिसूचना काढत सीमाभागातील ८६५ गावामधील नागरिकांना महात्मा जन आरोग्य योजना लागू केली होती. या योजनेतंर्गत प्रति कुटूंब प्रतिवर्ष १.५० लक्ष रुपयेचे विमा संरक्षण तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २.५० लक्ष रुपयांचे विमा संरक्षण लागू केले होते. यामध्ये ३४ तज्ञसेवा व ९९६ उपचारांचा समावेश आहे. बेळगाव येथील के. एल. ई. इस्पितळ आणि गोवा येथील शासकीय इस्पितळ मधून या योजनेचा लाभ घेता येईल असा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला होता. बेळगावच्या के. एल. ई. इस्पितळात एक व्यक्ती महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ घेण्यासाठी पोहचली असता के. एल. ई. इस्पितळच्या प्रशासनाने हि योजना सद्या फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना लागू आहे बेळगावसाठी अजून कार्यान्वित झाली नसल्याचे सांगितले, सदर व्यक्तीने महाराष्ट्र शासनाने काढलेला अध्यादेश दाखविला पण इस्पितळच्या प्रशासनाने महात्मा जन आरोग्य योजनेचा लाभ बेळगावातील नागरिकांना सामावून घेण्याचे कोणतेही आदेश आम्हाला अजून प्राप्त झाले नसल्याचे माहिती दिली.
त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांमधून येत आहे

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *