Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या हालचाली गतिमान

  खानापूर : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असतानाच या निवडणुका पाठोपाठ राज्यातील जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणूका देखील होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदार संघ पुनर्रचना झाली असून केवळ इतर मागास वर्ग आरक्षण जाहीर करणे शिल्लक राहिले आहे. येत्या आठ दिवसात हे आरक्षण देखील जाहीर होणार असून राज्य …

Read More »

प. पू. भगवानगिरी महाराज यांची जत्ती मठाला सदिच्छा भेट

  बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे येत्या रविवारी होणाऱ्या श्रीक्षेत्र कुऱ्हे पानाचे येथील भव्य हरिपाठ मंदिराच्या भूमिदान संकल्प सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आलेले श्री रामनाथगिरी समाधी मठ संस्थान कसबा नूलचे (ता. गडहिंग्लज) श्री राष्ट्रीय धर्माचार्य प. पू. स्वामी भगवानगिरी महाराज यांनी आज शुक्रवारी शहराचे श्रद्धास्थान असलेल्या …

Read More »

विजयपूरात मित्राचा खून करून एकाची आत्महत्या

विजयपूर : एका तरुणाने मित्राचा चाकूने वार करून हत्या केल्याची व स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना विजयपूर शहरातील लक्ष्मी सिनेमा मंदिर समोरील राजधानी लॉजमध्ये घडली आहे. बेल्लारी जिल्ह्यातील हागरीबोम्मनहल्ली तालुक्यातील कृष्णपुरा तांडा येथील रहिवासी सी. इंद्रकुमार यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. …

Read More »

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

  नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली …

Read More »

समर्थ इंग्रजी स्कूलचा क्रिडोच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न

  खानापूर (प्रतिनिधी) : पूर्वापार चालत आलेल्या शैक्षणिक पध्दतीत बदल घडवून नविन संकल्पनेची जोड देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी लावण्यासाठी खानापूर येथील समर्थ इंग्रजी शाळेच्या संस्था चालकांनी क्रिडोच्या माध्यमातून जागतिक स्मार्ट शिक्षण पध्दतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. याजागतिक स्मार्ट शिक्षण पध्दतीच्या माध्यमातून क्रिडोच्या पध्दतीचा अवलंब करून एल के जी, यू …

Read More »

जितो लेडिस विंगच्या वतीने एप्रिल २ रोजी अहिंसा रन

  बेळगाव  : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो लेडी विंगच्या वतीने 2 एप्रिल रोजी देशभरात अहिंसा रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आणि हा कार्यक्रम विक्रम मोडणारा कार्यक्रम असल्याचे जितो बेळगाव लेडीज विंगच्या अध्यक्षा शोभा दोड्डन्नवर यांनी सांगितले. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जितो एपेक्स व्यवस्थापन मंडळाच्या …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक संपन्न

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे संपन्न झाली. बैठकीमध्ये पुढील काळात बेळगाव सीमाभागात मराठी भाषा संवर्धनासाठी व संरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले. 2023 हे साल गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव …

Read More »

लोंढा चेकपोस्टवर 25 मिक्सर पोलिसांच्या ताब्यात

  खानापूर : कोणताही परवाना किंवा खरेदी बिल नसलेली मिक्सर ग्राइंडरची अनधिकृत वाहतूक करणारे वाहन लोंढा (ता. खानापूर) चेक पोस्टवर खानापूर पोलिसांच्या मदतीने निवडणुकीच्या नोडल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. 62 हजार 500 रुपयांचे 25 मिक्सर ग्राइंडर व चारचाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी 29 चेकपोस्ट …

Read More »

कर्नाटक विधानसभा निवडणूक; 27 किंवा 28 मार्च रोजी घोषणा होण्याची शक्यता

  बंगळुरू : केंद्रीय निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटकात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. निवडणूक आचारसंहितेने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना प्रक्रियेची तयारी करण्यास सांगितले आहे. 27 किंवा 28 मार्चला विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व …

Read More »

कोगनोळीत तयार झालेल्या पुतळ्याचे रविवारी अमित शहांच्या हस्ते उद्घाटन

  निपाणी : कोगनोळी येथील प्रसिद्ध मुर्तीकार, शिल्पकार अमित डोंगरसाने यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा 11 फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा तयार केला असुन नुकताच तो कर्नाटकातील बिदर तालुक्यातील गोरटा या गावी रवाना झाला. त्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक …

Read More »