Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

‘सुवर्णलक्ष्मी’तर्फे महिला दिन उत्साहात

बेळगाव : बेळगाव येथील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटीच्या सभागृहात ११५ वा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सौ. सुरेखाताई पोटे उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर, संस्थापक मोहन कारेकर, व्हा. चेअरमन विजय सांबरेकर होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे …

Read More »

श्री ब्रह्मलिंग मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने जागतिक महिला दिन व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टीपर्पज को-ऑफ. सोसायटीच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिन व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद सिद्धाप्पा कालसेकर, चेअरमन श्री. जोतिबा गोविंद कालसेकर, व्हाईस चेअरमन श्री. प्रकाश सायनेकर तसेच कार्यक्रमाला महिला प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामपंचायत …

Read More »

मजदूर नवनिर्माण संघाच्या वतीने येळ्ळूरच्या रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या महिलांसोबत जागतिक महिला दिनाचे आयोजन

  बेळगाव : आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कष्टकरी कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ माध्यमातून येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या सोबत महिला दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोगतज्ञ डाॅ. सुरेखा पोटे, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, प्रभारी पीडिओ सदानंद मराठे व राज्यस्तरीय …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त खानापूरच्या जनता आधार सौहार्द सोसायटीच्या संचालकांचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जनता आधार सौहार्द सोसायटीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने संचालिका सौ. कल्पना सावंत, व सौ. सविता गडाद या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता आधार सौहार्द सोसायटीचे चेअरमन व खानापूर तालुका आप आदमी पक्षाचे सचिव शिवाजी गुंजीकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाला …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

  बेळगाव : महिला दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशन आणि टिळकवाडी येथील सिद्धी महिला मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर रक्तदान शिबिर बिम्स परिसरात पार पडले. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत महिला दिनी एंजल फाउंडेशनने रक्तदान शिबिर पार पाडले. यावेळी जवळपास 50 हुन अधिक महिलांनी या रक्तदान …

Read More »

तिघीं मुलींसह आईने फिनेल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

  बेळगाव : तीन मुलींसह फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न 40 वर्षीय महिलेने केला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तिने मुलींना फिनेल पाजविले आणि नंतर स्वतःही फिनेल प्राशन करून मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. फिनेल पिऊन अत्यवस्थ झालेल्या या चौघांना तात्काळ बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मूळची …

Read More »

शेंडूरमधील शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखणार

राजू पोवार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता)  : दीड वर्षांपूर्वी शेंडूर गावातील शेतकऱ्यांनी सर्वांच्या संमतीने दहा फूट रस्ता आपल्या शेतामध्ये सोला होता. सध्या या गावामध्ये पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प आलेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता, नोटीस न पाठविता कंपनीकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या गावातील …

Read More »

विकलांग विद्यार्थ्यांनी जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर जीवनात प्रगती साधावी : किरण जाधव

  बेळगाव : अपंगत्वाचा बाऊ न करता परिस्थितीवर मात करीत अनेक विकलांगानी यशोशिखरे गाठलेली आहेत. अशा लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य विकलांगांनी जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर जीवनात प्रगती साधावी आणि आपल्या पालकांचे ऋण फेडावेत, असे भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. …

Read More »

जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांनी केली मतदान केंद्राची पाहणी

  मतदान केंद्रात किमान पायाभूत सुविधा पुरविण्याची सूचना बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर किमान पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी आज बुधवारी विविध विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पायाभूत सुविधांची पाहणी …

Read More »

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाप्रणित सरकारला पाठिंबा

नवी दिल्ली : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत कोहिमाममध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ७ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला. याबाबत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात …

Read More »