Saturday , June 6 2026
Breaking News

जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांनी केली मतदान केंद्राची पाहणी

Spread the love

 

मतदान केंद्रात किमान पायाभूत सुविधा पुरविण्याची सूचना

बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर किमान पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी आज बुधवारी विविध विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पायाभूत सुविधांची पाहणी केली.

यरगट्टी, कौजलगी, मुडलगी, घटप्रभा, शिंदीकुरबेट, गोकाक, बेल्लद बागेवाडी, उळागड्डी खानापुर आदी मतदान केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: भेट दिली.

मतदान केंद्रातील पायाभूत सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रात किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र हवेशीर आणि प्रकाशमान असावेत. याशिवाय पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व इतर व्यवस्था करावी. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत.

याच प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला.
स्थानिक तहसीलदारांसह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सोन्या-चांदीचे १८ लाखांचे दागिने जप्त; घरफोडी प्रकरणी संशयित अटकेत

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध भागांत घरफोडी व चोरीच्या घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *