बेळगाव : शहरातील प्रजापिता ईश्वरी विद्यापीठाच्या वतीने महाशिवरात्रीचा पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरून ‘शिव संदेश’ शांती सद्भावना यात्रा काढण्यात आली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बेळगाव शाखाप्रमुख अंबिका दीदी यांनी गुरुवारी शहरातील महांतेश नगर येथील प्रजापीता ईश्वरीय विद्यापीठात शांती सद्भावना वाहन चालवले. यावेळी बोलताना दादी अंबिका म्हणाल्या, हिंदू जीवनशैली आणि …
Read More »जुना पी. बी. रोडवर आढळला अनोळखी मृतदेह
बेळगाव : जुना पी. बी. रोड येथील एका दर्ग्याजवळ अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे मृत व्यक्तीचे वय 60 ते 65 आहे. शहापुर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्या वृद्धाचा मृत्यू आजारपणाने किंवा अशक्तपणाने झाला असेल असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती 5 फूट 4 इंच, …
Read More »महाशिवरात्री निमित्त उद्यापासून दक्षिणकाशीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवारपासून रात्री 12 नंतर पंचामृत अभिषेकाला सुरुवात होणार आहे. श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने पहिला अभिषेक समस्त बेळगावकर नागरिकांच्या साठी करण्यात येणार आहे. त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक सुरू राहणार आहे. त्यानंतर रुद्राभिषेक …
Read More »देवरवाडी येथे जल जीवन मिशन भारत अंतर्गत “हर घर जल” योजनेच्या फलकाचे उद्घाटन
देवरवाडी : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर जल” योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेच्या फलकाचे उद्घाटन देवरवाडी तील प्रगतशील शेतकरी विष्णू कांबळे यांच्या हस्ते झाला. या योजने अंतर्गत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांचेकडून १ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्यामुळे गावातील लोकांचा पिण्याचा पाण्याचा …
Read More »येळ्ळूरमध्ये ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम सोमवारी
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने सोमवार (ता. 20) फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8-00 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील संमेलन स्थळी राधानगरी येथील ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा भव्य दिव्य असा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा सुवर्णमय इतिहास दर्शविणारा हा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. …
Read More »निवडणूक प्रचाराच्या साहित्याचे दर निश्चित करणार : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्याचे दर निश्चित करून ते निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहेत. आचारसंहिता लागू असताना या दरांच्या आधारे प्रचाराचा खर्च काढला जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक-2023 च्या प्रचार साहित्याच्या किंमतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व …
Read More »येळ्ळूरमध्ये रविवारी 18 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी खास आकर्षण संमेलन तयारी पूर्णत्वाकडे येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 19 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत (मराठी मुलांची शाळा येळ्ळूरवाडी पटांगण परमेश्वर नगर येळळूर) 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य संमेलन आयोजनाची तयारी पूर्णत्वाकडे …
Read More »निपाणी ‘अरिहंत चषक’ रिच फार्मसकडे
काला पत्थर संघ उपविजेता : उत्तम पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह व टॉप स्टार क्रिकेट क्लबतर्फे येथील मुन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित अरिहंत चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना रोमहर्षक होऊन रिच फार्मस संघाने अरिहंत चषकावर आपले नाव कोरले. तर काला पत्थर संघाच्या …
Read More »होनकल, असोग्यात आग लागून ऊस, काजु बागेचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील होनकल व आसोगा आदी ठिकाणी ऐन उन्हाळ्यात आग लागुन काजू बागेचे व ऊसाचे प्रचंड नुकसान झाल्याची घटना नुकताच घडली. होनकल (ता. खानापूर) गावापासुन जवळ असलेल्या सर्वे नंबर २३ मधील तीन ते चार एकर जमिनीतील काजु बागेला दुपारच्या भर उन्हात आग लागून काजू बागेचे प्रचंड …
Read More »हंचिनाळ येथे ऊस व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
हंचिनाळ : श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी यांच्यामार्फत येथे ऊस विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी हंचिनाळ ग्रामपंचायतचे चेअरमन बबन हवालदार हे होते. प्रारंभी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार यांनी स्वागत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta