Wednesday , June 3 2026
Breaking News

Belgaum Varta

वडगावात आज शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परंपरेनुसार वडगाव परिसरात शुक्रवारी (दि. २६) संध्याकाळी चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी तयारी केली आहे. वडगाव परिसरात शहराच्या एक दिवस आधी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. यंदा शहराची शनिवारी (दि. २७) चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे शुक्रवारी वडगाव परिसरातील चित्ररथ …

Read More »

उद्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी शनिवारी (दि. २७) शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. राणी चन्नम्मा चौकातून खानापूरकडे जाणारी वाहने क्लब रोडमार्गे गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. २, शर्कत पार्क, …

Read More »

मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : 1 जुन रोजी होणाऱ्या आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गर्लगुंजी येथील येथील अरुण मष्णू पाटील (वय 63) हे 1 जून रोजी होणाऱ्या आपल्या …

Read More »

सिमेंटच्या पाईप डोक्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू

  सौंदलगा येथील घटना : जगण्याची झुंज ठरली अपयशी निपाणी (वार्ता) : डोक्यावर सिमेंट पाईप पडल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना माळ भाग सौंदलगा येथे घडली. तीन दिवस जगण्यासाठी केलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उत्तम शिवाजी …

Read More »

लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपदाची लॉटरी; शनिवारी होणार शपथविधी

  बेंगळुरू : काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून आज 20 जणांची यादी निश्चित होण्याची शक्यता आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांच्यासह 20 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी (२७ मे) रोजी सकाळी ११.४५ वाजता शपथविधी होणार आहे. यामध्ये लक्ष्मी …

Read More »

कुनोमध्ये आणखी दोन चित्त्यांच्या पिलांचा मृत्यू, आतापर्यंत एकूण पाच चित्ते मृत्यूमुखी

  भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या मृत्यूची मालिका थांबायचं नाव घेत नाही. ज्वाला नावाच्या मादी चित्त्याच्या आणखी दोन पिल्लांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर मरण पावलेल्या चित्त्यांची संख्या पाच झाली आहे. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या दोन बिबट्यांचा समावेश आहे. चित्याच्या या पिल्लांचा मृत्यू अशक्तपणामुळे आणि वाढत्या …

Read More »

बेळ्ळारी नाल्याची साफसफाई म्हणजे शेतकऱ्यांना भकास करण्याचे षडयंत्र

  बेळगाव : पावसाळ्यात पावसाचे पाणी बेळ्ळारी नाल्यातून न जाता परिसरातील शेत जमिनीमध्ये जाते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून नवनिर्वाचित सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण संबंधित अधिकाऱ्यांनी करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार बेळ्ळारी नाल्याची सफाई करण्यात येत आहे पण …

Read More »

संसदेत राष्ट्रवादी ‘आप’च्या पाठीशी; अरविंद केजरीवाल यांनी घेतली शरद पवारांची भेट

  मुंबई : केंद्र सरकारने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात अध्यादेश आणला असून त्याविरोधात अरविंद केजरीवाल यांनी आता विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि …

Read More »

नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा नियती फाऊंडेशनच्यावतीने सत्कार

  खानापूर : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा आज खानापूर नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच खानापूर भाजपच्या महिला प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने मोठा विजय संपादन केला आहे. या यशाबरोबरच जबाबदारी देखील मोठी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. केपीसीसी कार्याध्यक्ष व नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या आमदारांचे शिष्टमंडळ सध्या राजधानी दिल्लीत ठाण मांडून आहे. या शिष्टमंडळात सतीश जारकीहोळी यांच्यासोबत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, …

Read More »