खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वेगेटवर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शनिवारी व रविवारी खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम …
Read More »भव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वर सप्त सुरांचे.. नाद भजनाचे’ ही भव्य भजन गायन स्पर्धा आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम काल बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. भजन स्पर्धेचे प्रथम क्रमांकसह विजेतेपद कोल्हापूरच्या पेठ वडगाव येथील श्री माऊली भजनी मंडळाने पटकावले. …
Read More »हलगा -मच्छे बायपास दावा उच्च न्यायालयाने फेटाळला
बेळगाव : हलगा -मच्छे बायपास रस्त्या संदर्भातील बेळगाव दिवाणी न्यायालयात शेतकऱ्यांनी दाखल केलेला दावा मेंटेनेबल असल्याचा निर्णय देऊन उच्च न्यायालयाने त्या संदर्भातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखल केलेली रिट याचिका (सीआरपी) फेटाळून लावली आहे. तसेच प्राधिकरणाचा संपूर्ण दावा बेदखल केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सपशेल तोंड घशी पडून पराभूत झाले आहे …
Read More »“…तर काय देता येईल याबद्दल बोलता येईल”; सांगलीतील गावांवरुन चालू असलेल्या कर्नाटक- महाराष्ट्र वादावर पवारांचं सूचक विधान
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल जत तालुक्यातील ४० गावं आणि आज सोलापूर, अक्कलकोटमधील कानडी भाषिकांवरून केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान, सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना परखड शब्दात सुनावले आहे. जर ते बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर मराठी भाषिक प्रदेश …
Read More »“कुणीही यावं, टपली मारून जावं आणि आम्ही…”, उद्धव ठाकरेंचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्र
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केल्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांच्यावरही बोम्मई यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत टीका केली. त्यानंतर …
Read More »निपाणी येथे आढळले नवजात अर्भक!
अधिकाऱ्यांनी दाखवली माणुसकी : अर्भक बेळगाव बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेला असलेल्या बदलमुख रस्त्याच्या कडेला गुरुवारी (ता.२४) सकाळी नवजात अर्भक आढळून आले. पुरुष जातीचे अर्भक एका पिशवीत सोडले होते. साक्षीदाराने अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार महिला व बालविकास अधिकारी, डी. बी. सुमित्रा, डॉ. जी. बी. मोरबाळे यांच्या …
Read More »शेतकऱ्यांना त्रास द्याल तर रेल्वे मार्गच बंद करू : के. के. कोप्प वासीयांचा निर्धार
खानापूर (प्रतिनिधी) : के. के. कोप्प या गावी नवीन होणाऱ्या रेल्वे मार्ग विरोधात शेतकऱ्यांची बैठक नुकताच पार पडली. यावेळी शेतकरी वर्गाने, कोणत्याही परिस्थितीत आपली १ इंच जमीन रेल्वेसाठी देणार नाही, अशी भावना व्यक्त केली. स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून होत आहे अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यात …
Read More »लष्करी सेवेत अग्निवीर सुविधांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : एकदिवसीय प्रेरक अभ्यास भेटीचा भाग म्हणून गोपालजी पी. यू. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि देवेंद्र जिनगौडा हायस्कूल, शिंदोळीच्या विद्यार्थी यांच्यासह गोपाल जिनगौडा फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाळ डी. जिनगौडा, सचिव, प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि कर्मचारी यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगावला कर्नल बिस्वास यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने अलीकडे …
Read More »कर्नाटक आणि पाकिस्तानमध्ये काय फरक, सीएम बोम्मईंवर नीलम गोऱ्हेंचा प्रहार
मुंबई : सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ‘सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचा वक्तव्य बोम्मई यांनी केले. यावर आता नव्याने राजकीय वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सोलापूर आणि …
Read More »..म्हणे सोलापूर, अक्क्लकोटही घेऊ : बोम्मई यांचा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न
बेंगलोर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकही गाव कर्नाटकला देणार नाही, असं स्पष्ट केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा ट्वीट करुन मराठी भाषिक आणि महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावेत, अशी मागणी करुन कर्नाटकची एक इंच भूमी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta