बेळगाव : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगावच्या नियोजित रिंगरोड विरोधात येत्या सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य चाबूक मोर्चाला संपूर्ण पाठिंबा द्यावा, अशी विनंती बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव बार असोसिएशनला करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या बेळगाव रिंगरोडचा प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी येत्या …
Read More »म. ए. समितीच्या पाठीशी इदलहोंडवासीय खंबीर
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची विस्तृत कार्यकारिणी करण्यासाठी इदलहोंड पंचायतमधील गावे खेमेवाडी, झाडअंकले, माळअंकले, सिंगीनकोप आणि निट्टूर पंचायतीतील निट्टूर व गणेबैल गावांचा समितीच्या आठ प्रतिनिधींसमवेत समितीची नेतेमंडळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, संतोष पाटील इत्यादींनी दौरा केला. इदलहोंड येथील श्रीपिसेदेव मंदीरात सभा …
Read More »ऊस दर प्रश्नी विधानसभेवर आंदोलनाची तयारी पूर्ण
राजू पोवार : माजी मंत्री इब्राहिम यांच्याशी बैठक निपाणी : ऊस दरासाठी रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन मोर्चे काढून सरकारला निवेदन दिले आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी कारखाने सुरू न करण्याच्या सूचना साखर मंत्री व साखर आयुक्तांनी केली …
Read More »सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्ती वेतन
सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …
Read More »सीमाप्रश्नासंदर्भात चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्याकडे जबाबदारी
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या संदर्भात मुंबई येथे झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नी पुढील हालचालीसाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ …
Read More »खानापूर-अनमोड रस्ता निकृष्ट दर्जाचा
खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर- रामनगर, अनमोड -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.४ कायद्याच्या चौकटीत अडकून पडला होता. तो रस्ता आता पुन्हा करण्यात येत आहे. मात्र रस्ता करण्यासाठी मोहरम ऐवजी साधी माती वापरण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे सर्वत्र धूळ उडत आहे यामुळे दुचाकीस्वारांना त्रास सहन …
Read More »सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीच्या महत्वपूर्ण बैठकीला सुरुवात
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहात नुकताच सुरू झाली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असतील उच्चाधिकार समितीमध्ये 14 नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यांच्यासह …
Read More »मतदार नोंदणी मोहीम यशस्वीपणे राबवा
निवडणूक अधिकारी प्रविण कारंडे : निपाणी, बेडकीहाळ येथे बीएलओंना प्रशिक्षण निपाणी (वार्ता) : मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली असून ८ डिसेंबरपर्यंत सदर मतदार यादी संदर्भात कोणत्याही हरकती असल्यास नोंदवाव्यात. तसेच अजूनही वंचित असलेल्या व्यक्तींची मतदारयादीत नावे नोंदविण्यासाठी ८ डिसेंबरपूर्वी मुदत आहे. या वेळेत बीएलओ यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे जागृती करावी, …
Read More »शाहू नगरातील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा
निपाणी (वार्ता) : येथील शाहू नगरातील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी लावलेल्या दिल्यामुळे हनुमान मंदिर परिसर उजळून निघाला होता. तत्पूर्वी सकाळी हनुमान मूर्ती अभिषेक घालण्यात आला. प्रारंभी नगरसेवक संतोष सांगावकर, रवींद्र इंगवले, पत्रकार राजेंद्र हजारे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर भाविकांनी हनुमान मंदिर परिसरात …
Read More »बेनाडी येथे उद्या मॅरेथॉन स्पर्धा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा नेते युवा नेते उत्तम पाटील युवाशक्ती बोरगाव यांच्यावतीने बेनाडी (ता. निपाणी) येथे मंगळवारी (ता.२२) भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष गटासाठी ५ किलोमीटर अंतर असून प्रथम ते पाचव्या क्रमांकापर्यंत अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २ हजार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta