Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूर मलप्रभा क्रीडांगण सुविधांपासून वंचित; लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणाची उभारणी करून गेल्या दहा वर्षानंतरही आजतागायत मलप्रभा क्रीडांगण अनेक सुविधांपासून वंचीत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झाले आहे. माजी आमदार कै. प्रल्हाद रोमाणी यांच्या काळात उभारणी करून जेवढी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तेवढ्याच आजपर्यंत सुविधा दिसून येत आहेत. मात्र महत्वाच्या …

Read More »

हेम्माडगा-खानापूर रस्त्याची समस्या तात्काळ सोडवा

  खानापूर : हेम्माडगा-खानापूर रस्त्यावर मणतुर्गे गावानजीक रेल्वे गेट जवळच्या रस्त्याची नुकताच डागडुजी करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता करत असताना खडी ऐवजी मोठे बोल्डर वापरण्यात आले आहेत त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हेम्माडगा मार्गे गोव्याला जाणारी वाहने देखील या रस्त्यावरून ये-जा करत असतात. या मार्गे होणारी …

Read More »

गणेश दूध संकलनातर्फे गावागावांत जनजागृती करणार : उमेश देसाई

  बेळगाव : सीमाभागात काही संस्थांकडून निर्धारित दर देण्याऐवजी प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपये कमी दिले जात आहे. प्रत्येक संस्थेला दरपत्रक दिलेले असून देखील ते लावले जात नाही. दरासंदर्भात उत्पादकांना अंधारात ठेवले जात आहे. यासाठी गावागावात जनजागृती करणार असल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे प्रमुख उमेश उर्फ प्रवीण देसाई यांनी …

Read More »

आयसीसीच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची बाजी!

  नवी दिल्ली : टी-20 वर्ल्डकप 2022 स्पर्धा ऑस्ट्रेलियात पार पाडली. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेटनी विजय मिळवत दुसर्‍या विजेतेपदावर नाव कोरले. इंग्लंडने याआधी 2010 साली विजेतेपद मिळवले होते. अंतिम सामना झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने टी-20 वर्ल्डकप 2022च्या सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात 12 …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन

  मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे रात्री उशिरा निधन झालं. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. सुनील शेंडे यांचं रात्री 1 वाजता विले पार्ले पूर्व इथल्या राहत्या घरी …

Read More »

मतदार यादीत दुरुस्तीसाठी वेळापत्रक जाहीर; अंतिम मुदत 8 डिसेंबर

  बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने छायाचित्रासमवेतच्या मतदार यादीत किरकोळ दुरुस्तीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. तक्रारी दाखल करण्याची अंतिम मुदत 8 डिसेंबर असून तक्रार निवारण 26 डिसेंबरला होणार आहे. तर अंतिम यादी 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी 4 डिसेंबरपर्यंत जनजागृती केली जाणार आहे, असे मुख्य निवडणूक …

Read More »

कावळेवाडीत किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

  बेळगाव : कावळेवाडीत राष्ट्रपिता म. गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे दरवर्षीप्रमाणे किल्ला स्पर्धेचे याही वर्षी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात गावातील देवालयात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पी. आर. गावडे उपस्थित होते. प्रांरभी शिवप्रतिमेचे पूजन मोहन तरवाळ यांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक …

Read More »

खानापूरात जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका लोकसंस्कृती नाट्य कला संस्था प्रस्तुत शाहिर अभिजित कालेकर व कलाकारानी खानापूर येथील अर्बन बँक समोरील पिंपळकट्यावर आयोजित जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी रात्री पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसंस्कृती नाट्यकला संस्थेचे संस्थापक दादासाहेब तोपीनकट्टी उपस्थित होते. तर कार्यक्रमाला पीएलडी बँक चेअरमन मुरलीधर पाटील, भाजप तालुका अध्यक्ष …

Read More »

जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर

  बेळगाव : दरवर्षी बालदीनानिमित्त कै. श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिला जाणारा जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यावर्षी सरकारी मराठी मॉडेल स्कुल, येळ्ळूरची विद्यार्थिनी समीक्षा महादेव कुगजी, न्यू इंग्लिश प्राथमिक मराठी शाळा मुतगे ची योगिता यशवंत पाटील, ठळकवाडी हायस्कूलची किरण विकास लोहार, सरकारी मराठी शाळा नं …

Read More »

विश्वचषकाचा इंग्लंड ठरला बादशाह!

  मेलबर्न : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव …

Read More »