Sunday , September 20 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचा यावर्षी पासून विशेष साहित्य पुरस्कार : साहित्यिकांना आवाहन

Spread the love

 

 

येळ्ळूर : येथील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने यंदापासून विशेष साहित्यिक पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्काराचे पुरस्कर्ते उद्योगपती आप्पासाहेब गुरव हे आहेत. मराठी साहित्यामधील कथा, कादंबरी, नाटक, कविता आधी मध्ये ग्रामीण भागातील स्त्रीचे चित्रण उठावदारपणे करण्यात आलेले आहे. अशा साहित्य कृतीला यंदापासून आप्पासाहेब गुरव यांच्या आजी गंगुबाई आपय्या गुरव यांच्या नावे हा साहित्य पुरस्कार देण्यात असून येणार असून या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये सात हजार, मानचिन्ह, शाल श्रीफळ असे असणार आहे. तरी ग्रामीण भागातील स्त्रीचे  मराठी साहित्यात उठावदारपणे चित्रण केलेल्या साहित्यिकांनी  आपले साहित्य किंवा पुस्तके येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाकडे पाठवून द्यावीत. सदर साहित्य 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रसिद्ध झालेले असावे. साहित्यिकांनी आपले साहित्य 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावे. पत्ता-  येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ येळ्ळूर ता. बेळगाव, जिल्हा बेळगाव, राज्य – कर्नाटक या पत्त्यावर पाठवावीत  किंवा अधिक माहितीसाठी  साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे मो. 9341339940 किंवा सचिव प्रा. सी. एम. गोरल मो. 9342813216 यांच्याशी संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *