बेळगाव : भरधाव टिप्परची ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष महावीर हुडेद (वय वर्षे 23) राहणार विजयनगर हलगा असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 7 च्या सुमारास सदर अपघात राष्ट्रीय महामार्गाजवळील खमकारट्टी गावाजवळ घडला आहे. संतोष हुडेद हा आपला …
Read More »‘संतमीरा’च्या स्नेहसंमेलनाला डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित
बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विविध स्पर्धा, मान्यवरांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत होत्या. अनगोळ येथील संतमीरा शाळेतर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 20 जानेवारीला आयोजित करण्यात आले होते. नियोजित कार्यक्रमाला उद्योजिका प्रिया पुराणिक, …
Read More »रोहित-शुबमनची कमाल, शार्दूलची धमाल! भारताचा किवींवर ९० धावांनी विजय
इंदोर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने ९० धावांनी जिंकत मालिकेत ३-०ने निर्भेळ यश संपादन केले. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी झळकावलेल्या वेगवान शतकांच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ९ बाद ३८५ धावा धावफलकावर लावल्या. …
Read More »नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के; ५.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, एकाचा मृत्यू
काठमांडू : नेपाळच्या पश्चिम भागात ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून एकजणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सुदूर-पश्चिम प्रांतातील बाजुरा जिल्ह्यातील मेळा भागात होता. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भारतात दिल्ली व जयपूरच्या काही …
Read More »भाजपा-शिवसेना युती तोडायला लावणारे खरे ‘मास्टरमाइंड’ एकनाथ शिंदेच? संजय राऊतांचं सूचक विधान
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. संजय राऊतांमुळे भाजपासोबतची युती तुटली? त्यांच्यामुळेच पक्ष फुटला, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यावर संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला …
Read More »सेवंतीभाई शहा यांचे निधन
शहापूर मुक्तीधाम येथे सकाळी अंत्यसंस्कार बेळगाव : मंगळवार पेठ. टिळकवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सेवंतीभाई चतुरदास शहा (वय ८६) यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता अंत्ययात्रा निघणार असून शहापूर मुक्तीधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार …
Read More »चिकोडी वरिष्ठ उपनिबंधक लाच घेताना ताब्यात
चिकोडी : चिकोडी उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्तानी छापा टाकून 30 हजार लाच घेताना चिकोडी वरिष्ठ उपनिबंधक यांना ताब्यात घेतले आहे. बेळगाव लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्त पथकाने चिकोडी उपनिबंधक कार्यालयावर अचानक छापा टाकला. यावेळी जमीन खाते बदल करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेत असताना चिकोडी वरिष्ठ उपनिबंधक शिवराजू …
Read More »निपाणीतील क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर संघ विजेता
सांगली संघ उप विजेता : १४ वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा निपाणी (वार्ता) : येथील चॅलेंजर स्पोर्टस् ऍण्ड युथ क्लब व समर्थ व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (ता. २३) अटीतटीचा झाला. त्यामध्ये कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम संघाने विजेतेपद पटकावले. तर सांगलीच्या अनिल …
Read More »निपाणीतील शिबीरात ५१ जणांचे रक्तदान
श्रीराम सेनेतर्फे आयोजन : रक्तदात्यांना हेल्मेट वितरण निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना कर्नाटक यांच्यातर्फे संस्थापक प्रमोद मुतालिक यांचा जन्मदिवस आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त येथील संत नामदेव मंदिरात चिकोडीतील आदर्श ब्लड बँकेच्या सहकार्याने सोमवारी (ता.२३) रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ५१ रक्तदात्यांनी रक्तदान …
Read More »संगणक उताऱ्यासाठी ग्रामस्थांच्या फेऱ्या
पन्नासहून अधिक अर्ज : ग्रामस्थांची कुचंबणा कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारे संगणक उतारे गेल्या चार पाच महिन्यापासून वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीला फेऱ्या मारण्याचे काम सुरू आहे. यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अनेक नागरिकांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी बँक लोन व अन्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta