मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटालाही नवं चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असून ढाल-तलवारीचं चिन्ह देण्यात आली आहे. त्रिशूळ …
Read More »उद्धव ठाकरेंच्या “मशाल” चिन्हाचे पिरनवाडीत जोरदार स्वागत!
बेळगाव : बेळगाव सीमा लढ्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी होते तेच चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचा आनंद यावेळी व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षाच्या नवीन नावाचे आणि चिन्हाचे बेळगावात देखील जल्लोषी स्वागत झाले. पिरनवाडी येथे तालुका प्रमुख सचिन …
Read More »केंद्र सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार गुडन्यूज?
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा करण्यात आली नाही. ही घोषणा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होते. मात्र यावेळी उशीर झाल्याने शेतकरी आतूरतेनं याची वाट पाहात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच एमएसपीची घोषणा करू शकते. सीएसीपीने रब्बी पिकांसाठी ३ ते ९ टक्क्यांपर्यंत एमएसपी वाढवण्याची शिफारस केली आहे. …
Read More »धारवाडजवळ झालेल्या भीषण अपघातात युवा काँग्रेस नेते यशवंत यलीगार ठार
बेळगाव : यरगट्टी-मुनवळ्ळी युवक काँग्रेस शाखेचे अध्यक्ष यशवंत सोमशेखर यलीगार यांचा धारवाडजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. धारवाडहून मुनवळ्ळीकडे येत असताना इनामहोंगलजवळ सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यशवंत हे मुनवळ्ळी येथील आपले मित्र अक्षय विजय कडकोड (वय 25, रा. मुनवळ्ळी) हे कारमधून येत असताना कार रस्ता दुभाजकाला …
Read More »रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’ अध्यक्षपदासाठी आघाडीवर
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संयुक्त सचिव पदांसाठी आजपासून ( दि. ११) निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचे नाव आघाडीवर असून, सचिवपदासाठी पुन्हा एकदा जय शाह हे आपला अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. बीसीसीआय …
Read More »कार्यकर्ते ही पक्षाची मोठी ताकद : भाजप राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष
बेळगाव : भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्तिनिष्ठा न ठेवता पक्षनिष्ठा ठेवावी, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष म्हणाले. ते बेळगाव महानगर, ग्रामीण व चिक्कोडी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. बेळगाव येथील अंगडी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ रहा, पक्ष …
Read More »कन्हेरी सिद्धगिरी मठात सहहृदयी संत संमेलन
कोल्हापूर : कोल्हापूरजवळील कन्हेरी येथील सिद्धगिरी मठात अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सहहृदयी संत संमेलन उत्साहात पार पडले. सुमारे 20 स्वामीजी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई, विविध मंत्र्यांची यावेळी उपस्थिती होती. कोल्हापूरजवळील कन्हेरी येथील सिद्धगिरी मठात अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सहहृदयी संत संमेलन उत्साहात पार …
Read More »भाजपची उद्यापासून जनसंकल्प यात्रा
कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला शह देण्याचा प्रयत्न बंगळूर : स्वबळावर राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याची रणनीती आखत असलेला सत्ताधारी भाजप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली उद्या (ता. ११) पासून राज्यभर आयोजित दौर्याद्वारे विधानसभा निवडणुकीची घंटा वाजवणार आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेला …
Read More »जनवाड क्रॉस ते थाळोबा रस्ता कामाचा प्रारंभ
आमदार प्रकाश हुक्केरी यांचे प्रयत्न : १ कोटीचा निधी मंजूर निपाणी (वार्ता) : जनवाड – सदलगा रस्ता क्रॉस ते थळोबा मंदिर पर्यंतच्या रस्ता कामासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून या शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष कुमार मुधाळे यांच्यासह अन्न मान्यवरांच्या उपस्थितीत आम प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते पार पडला. महादेव स्वामींच्या …
Read More »पालिकेला “बकेट” वाटपाला मुहूर्त मिळेना…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेला बकेट वाटपाला मुहुर्त मिळेनासा झाला आहे. संकेश्वरकरांना ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्लास्टिक बकेट वाटप केले जाणार आहेत. पण बकेट वाटपाचे कार्य आज-उद्यावर पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे संकेश्वर नागरिकांतून बकेट वाटप कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी पालिकेने एका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta