Sunday , September 20 2026
Breaking News

पालिकेला “बकेट” वाटपाला मुहूर्त मिळेना…

Spread the love

 

संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेला बकेट वाटपाला मुहुर्त मिळेनासा झाला आहे. संकेश्वरकरांना ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्लास्टिक बकेट वाटप केले जाणार आहेत. पण बकेट वाटपाचे कार्य आज-उद्यावर पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे संकेश्वर नागरिकांतून बकेट वाटप कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी पालिकेने एका प्रभागात घनकचरा गोळा करण्यासाठी सदर प्रभागातील लोकांना बकेटचे वाटप केले होते. त्यामुळे अन्य प्रभागातील लोकांनी पालिकेकडे बकेटच्या मागणीचा रेटा लावल्याने पालिकेचे अधिकारी अडचणीत सापडले होते. संकेश्वरातील सर्व २३ प्रभागातील घर मालकांना ओला-सुका घनकचरा गोळा करण्याचा निर्णय घेऊन बकेट खरेदी केले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून पालिकेने स्वच्छ संकेश्वर सुंदर संकेश्वर बनविण्यासाठी संकेतिक बकेट वाटपाचा कार्यक्रम पार पाडला. आता गावातील सर्व २३ प्रभागात बकेट वाटपाचे कार्य कधी असा प्रश्न लोकांतून विचारला जात आहे.

दसऱ्यानंतर बकेट वाटप..
पालिकेचे मुख्याधिकारी आर. सी. चौगुला यांनी दसरा झालेनंतर सर्व २३ प्रभागातील लोकांना बकेटचे वाटप केले जाणार असल्याचे सांगितले होते. दसरा झाला आणि दिपावली जवळ आली तरी अद्याप बकेट वाटपाचे कार्य कोठेच दिसेनासे झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *