Sunday , July 26 2026
Breaking News

कार्यकर्ते ही पक्षाची मोठी ताकद : भाजप राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष

Spread the love

 

बेळगाव : भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्तिनिष्ठा न ठेवता पक्षनिष्ठा ठेवावी, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष म्हणाले.
ते बेळगाव महानगर, ग्रामीण व चिक्कोडी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
बेळगाव येथील अंगडी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ रहा, पक्ष वाढीवर भर द्या कार्यकर्ते ही पक्षाची मोठी ताकद आहे. कार्यकर्त्यांमुळेच पक्ष बळकट झाला आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी पक्षातील मतभेद दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आदर राखणे गरजेचे आहे, असेही यावेळी बी. एल. संतोष म्हणाले.
यावेळी कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून जिल्ह्यातील संघटनात्मक त्रुटीवर प्रकाश टाकल. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, खासदार मंगला अंगडी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले तसेच सर्व आमदार,खासदार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामीण महिला अध्यक्षा व खानापूर भाजपा महिला प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपण लिहिलेले “आरोग्य मंत्र” हे पुस्तक राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना भेट म्हणून दिले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *