Wednesday , June 3 2026
Breaking News

Belgaum Varta

आप्पाचीवाडी फाट्यावर वाहनधारकांची कसून तपासणी

  कोगनोळी : आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक ठिकाणी तपासनाके उभारले आहेत. आप्पाचीवाडी फाटा या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आडी डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस मल्लिकार्जुन डोंगर कर्नाटक-महाराष्ट्राची सीमा असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व वाहनधारकांची या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे. महसूल …

Read More »

कॉंग्रेसची उमेदवारी वशिलेबाजीने : कॉंग्रेस युवा नेते इरफान तालीकोटी यांचा आरोप

  खानापूर : खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव जाहिर होताच काँग्रेसचे युवा नेते व इच्छुक उमेदवार इरफान तालीकोटी यांनी ताबडतोब बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली असुन पत्रकारांनी आपण बंडखोरी करणार काय असे विचारले असता ते म्हणाले की, आपण …

Read More »

इलेक्ट्रिकल मर्चंट असो.ची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  बेळगाव : शहरातील इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी हॉटेल संकमच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. सदर वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद पाटील हे होते. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रामध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी भाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे अध्यक्ष अरविंद …

Read More »

दडपण चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

  बेळगाव : अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेकडून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दडपण चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हिंदू नवं वर्षाच्या प्रारंभी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यामुळे कलाकारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याप्रसंगी अनगोळ येथील ज्येष्ठ पंच …

Read More »

श्री मंगाईनगर रहिवासी संघाची स्थापना; बंडू केरवाडकर अध्यक्षपदी

  बेळगाव : मंगाईनगर, वडगाव येथील नागरी समस्यांच्या निवारणार्थ श्री मंगाईनगर रहिवासी संघाची स्थापना करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी बंडू केरवाडकर यांची निवड करण्यात आली आहे. मंगाईनगर वडगाव येथील रहिवाशांची बैठक काल शुक्रवारी सोमेश्वरी हॉल येथे पार पडली. सदर बैठकीत ज्येष्ठ पंच मंडळी, युवक आणि नागरिकांमध्ये श्री मंगाईनगर मधील विविध …

Read More »

मतदारसंघात खालच्या दर्जाचे राजकारण : युवा नेते उत्तम पाटील

  सुळगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम कोगनोळी : सुळगाव येथे उत्तम पाटील युवाशक्ती व अरिहंत उद्योग समूह यांच्या वतीने महिलांच्यासाठी हळदी कुंकू व होम मिनिस्ट्रर कार्यक्रम झाला. दिपप्रज्वलन माजी आमदार सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, बाबुराव मगदूम व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. युवा नेते उत्तम पाटील यांचे सुळगाव ग्रामस्थांच्या …

Read More »

सिंगीनकोपच्या कोसळलेल्या शाळा इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही, यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे अधीक्षक …

Read More »

खानापूरातील नव्या सरकारी दवाखान्याच्या इमारतीचा उद्घाटनाचा मुहूर्त नविन आमदारांच्या हस्ते होण्याचे संकेत?

  सध्या आचार संहितेचा बडगा? खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या सरकारी दवाखान्यासाठी २० कोटी रूपयाचा निधी वापरून नविन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेच्या कचाट्यात सापडल्याने नविन सरकारी दवाखान्याच्या इमारतीचा उदघाटनाचा मुहूर्त आता कधी मिळणार की कर्नाटक राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला प्रारंभ …

Read More »

“नवे क्षितिज नवी पहाट’ फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट”……

  आज दिनांक 25 मार्च 2023 आज 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून तुम्ही सेवानिवृत होत आहात. आपला जन्म 25 मार्च 1963 रोजी कंग्राळी खुर्द गावातील विश्वनाथ गोपाळराव जाधव आणि शेवंता विश्वनाथ जाधव यांच्या पोटी झाला. यांचे आपण प्रथम अपत्य, आपण आपले प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी मुलामुलींची शाळा कंग्राळी खुर्द व माध्यमिक …

Read More »

संघटित संघर्षातूनच शेतकऱ्यांवरील भूसंपादनाचे संकट टळेल : माजी खास. राजू शेट्टी

  बेळगाव : विकासाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमीन ओरबडून घेण्यात येत आहेत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. परंतु विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगे बांधून, त्यावर प्रगतीचे मनोरे रचण्यात राज्यकर्ते गुंतले आहेत. या विरोधात शेतकऱ्यांनी संघटित संघर्ष उभा केला पाहिजे. संघटित संघर्षातूनच बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर आलेले भूसंपादनाचे संकट टळेल, असे मत स्वाभिमानी शेतकरी …

Read More »