Sunday , July 26 2026
Breaking News

धारवाडजवळ झालेल्या भीषण अपघातात युवा काँग्रेस नेते यशवंत यलीगार ठार

Spread the love

बेळगाव : यरगट्टी-मुनवळ्ळी युवक काँग्रेस शाखेचे अध्यक्ष यशवंत सोमशेखर यलीगार यांचा धारवाडजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. धारवाडहून मुनवळ्ळीकडे येत असताना इनामहोंगलजवळ सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यशवंत हे मुनवळ्ळी येथील आपले मित्र अक्षय विजय कडकोड (वय 25, रा. मुनवळ्ळी) हे कारमधून येत असताना कार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. त्यामुळे यशवंत यलीगार ठार झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. यशवंत यलीगार हे यरगट्टी-मुनवळ्ळी ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर मुनवळ्ळी येथील तेगिहाळ रोडवरील मुक्तिधाम येथे आज मंगळवारी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *