Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावातून तडीपार

  बेळगाव : बेकायदा अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावतून तडीपार करण्यात आले आहे. असा आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी बजावला आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोहम्मदशफी मोदीनसाब ताशीलदार (वय 68, रा. खंजर गल्ली) आणि इजारअहमद महंमदइसाक नेसरीकर …

Read More »

दोन्ही राज्यातील भाजप सरकार सीमावाद वाढवत आहे

  सिध्दरामय्यांचा आरोप, महाजन अहवालाचे तुणतुणे बंगळूर : बेळगावसह सीमा भाग सामान्य स्थितीत परत येत असतानाच, माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने हा वाद विकोपाला नेला असल्याचा आरोप केला व आश्चर्य व्यक्त केले. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आहे. या …

Read More »

महाराष्ट्रातील खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार

  मुंबई : महाराष्ट्रातील खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्यं यावर भाजप खासदार गाऱ्हाणं मांडणार असल्याची माहिती आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी इतर दोन राज्यांच्या खासदारांशीही चर्चा करणार आहेत.   दरम्यान, महाविकास आघाडीचे खासदार …

Read More »

हाॅकी बेळगावतर्फे आंतर शालेय काॅलेज हाॅकी स्पर्धा आजपासून

  बेळगांव : हाॅकी बेळगावतर्फे आंतरशालेय व काॅलेज हाॅकी स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 डिसेंबर नेताजी सुभाष चंद्र बोस ( लेले ग्राऊंड ) येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इस्लामिया, बाशिबान, मदानी, द्यान मंदीर, भंडारी, हेरवाडकर, कॅंटोनमेंट, शानभाग, सेंट जाॅन, जी जी चिटणीस, फोनिक्स, महाविद्यालय तसेच जीएसएस, गोगटे, …

Read More »

हलशीवाडी येथे युवा स्पोर्ट्सतर्फे आयोजित किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

  खानापूर : गड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले निर्माण करायची परंपरा असून हलशीवाडी गावात देखील चांगले गड किल्ले निर्माण केले जात आहेत. त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी केले. हलशीवाडी येथे युवा स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात …

Read More »

पतसंस्था, बँकासमोर अनेक आव्हाने

अनिल स्वामी : ‘वीरशैव’च्या निपाणी शाखेला भेट निपाणी (वार्ता) : कोरोनामुळे गेले दोन वर्षे सर्वसामान्य नागरिक व्यवसायिक आणि बँकांनाही मोठा फटका बसला आहे. सध्या जनजीवन पूर्ववत होत आहे. तरीही भारतीय रिझर्व बँकेच्या बंधनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पतसंस्था आणि बँका चालवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत …

Read More »

…म्हणे महाराष्ट्रात कन्नडिगांना धोका!

  बेळगाव : सीमाप्रश्नावरून हिरेबागेवाडी टोल नाक्यावर उच्छाद मांडून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण केलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्रात कन्नडिगांना धोका असल्याचा कांगावा करत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा! या म्हणीचा प्रत्यय आला आहे. बेळगावात पोलिसांनी प्रवेशबंदी करूनही दोनच दिवसांपूर्वी बेळगावातील …

Read More »

खानापूरात भाजपच्यावतीने विजयोत्सव साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केले. यानिमित्ताने खानापूरात भाजपच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, किरण यळ्ळूरकर आदींनी छत्रपती …

Read More »

गुजरातमध्ये भाजपचा विजय; बेळगावमध्ये विजयोत्सव!

  बेळगाव : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर बेळगावात आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला. गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय संपादन केला आहे. त्या आनंदात बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी आज विजयोत्सव साजरा केला. शहरातील चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी पूजा केली. त्यानंतर मिठाई वाटून …

Read More »

दोन कारमध्ये भीषण अपघात : भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू

  मुडलगी : गुर्लापूरजवळील मुधोळ-निपाणी राज्य महामार्गावर बुधवारी रात्री टाटा टियागो कार आणि एर्टीगा कार यांच्यात झालेल्या अपघातात मोठा भाऊ आणि लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. रायबाग तालुक्यातील कप्पाळगुड्डी गावातील दुंडाप्पा अडिवेप्पा बडिगेर (३४) आणि बहीण भाग्यश्री नवीन कंभार (२२) हे दोघे बुधवारी रात्री धारवाडहून कप्पाळगुड्डी या मूळ …

Read More »