Monday , September 21 2026
Breaking News

अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावातून तडीपार

Spread the love

 

बेळगाव : बेकायदा अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावतून तडीपार करण्यात आले आहे. असा आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी बजावला आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोहम्मदशफी मोदीनसाब ताशीलदार (वय 68, रा. खंजर गल्ली) आणि इजारअहमद महंमदइसाक नेसरीकर (वय 48 रा. खंजर गल्ली) माळमारुती पोलिसांच्या कार्यक्षेत्रातून जॉनी जयपाल लोंढे (वय 36, रा.गॅंगवाडी), भैरगौडा जोतिबा पाटील (वय 45, रा. पाटील गल्ली कणबर्गी, आणि शहापूर पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून नितीन पांडुरंग पेडणेकर उर्फ पेरणकर (वय 50, रा. खडेबाजार शहापूर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तडीपार करण्यात यावे, असे प्रस्ताव मार्केट, माळमारुती आणि शहापूर पोलीसस्थानकाच्या निरीक्षकांनी मार्केटचे सहायक पोलीस आयुक्त नारायण बरमनी यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर एसीपी श्री. बरमनी यांनी ही यादी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांना पाठवली. त्यामुळे वरील पाच जणांना त्यांनी तडीपार करण्याचा आदेश आज बजावला आहे. पाच जणांना बळ्ळारी, कोप्पळ आणि विजयनगर जिल्ह्यात तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तनी एकाच दिवशी पाच जणांना तडीपार केल्याचा आदेश बजावल्याने अवैध धंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *