Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

श्रीकांत शिंदेंचे ‘त्या’ व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण

  मुंबई : आज सकाळपासून एका फोटोवरून राजकीय वर्तुळात नवी चर्चा पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. मागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असा बोर्ड असताना पुढे खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे हाकतात का? …

Read More »

शीतल हॉटेल जवळील थळ देवस्थान येथे कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी

  बेळगाव : खडे बाजार शीतल हॉटेल जवळील बेळगावमधील थळ देवस्थान (मुख्य देवस्थान) सुमारे 90 वर्षे पुरातन मंदिर आहे. या देवस्थानच्या परिसरात कचरा टाकून जमा करण्यात येतो. हा कचरा भरपूर प्रमाणात टाकण्यात येत असल्याने खूप दुर्गंधी पसरली असून किड्यांचा, उंदीर, घुस, गोगलगाय किडे लागून देवस्थानाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पूजा …

Read More »

पीएफआयने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण; अनेक ठिकाणी दगडफेक

  पीएफआय विरोधात केरळ हायकोर्टाचे कठोर पाऊल तिरुअनंतपुरम : केरळमध्ये कट्टर इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने शुक्रवारी संप केला. केरळ बंद दरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. केरळ उच्च न्यायालयाने या घटनांची स्वत:हून दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने कठोरपणा दाखवत संपावर बंदी घातली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंच्या गैरहजेरीत मुलाकडे मुख्यमंत्रीपदाचा कारभार!

  मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. या पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर खोचक …

Read More »

देवाच्या मूर्तीला स्पर्श केल्याने दलित मुलाला ६० हजारांचा दंड.. अधिकाऱ्यांनी त्याच मंदिरात नेऊन केली पूजा

  कोलार (कर्नाटक) : ग्रामदैवत बुथम्माला स्पर्श केल्याप्रकरणी एका अल्पवयीन दलित मुलाला ६० हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर मालूर मस्ती पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवारी कोलारचे डीसी व्यंकट राजा, एसपी डी. देवराज, उपाधीक्षक मुरलीधर आणि वरिष्ठ समाजकल्याण अधिकाऱ्यांनी मालूर तालुक्यातील मस्ती के उल्लेरहल्लीला भेट देत मुलगा आणि त्याच्या पालकांशी …

Read More »

कन्नड अधिकृत भाषा विधेयक विधानसभेत सादर

उल्लंघन करणाऱ्यांना दंडाची तरतूद; उच्च शिक्षणात आरक्षण, स्थानिकांना नोकरी बंगळूर : राज्य सरकारने गुरुवारी विधानसभेत कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास विधेयक मांडले, ज्यात कन्नडला सर्व स्तरांवर अधिकृत भाषा म्हणून लागू करण्यासाठी आवश्यक विधायक शक्तीचा समावेश आहे. कन्नड आणि संस्कृती, ऊर्जा मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी हे विधेयक सादर केले असून या …

Read More »

संगमला सहकार्य हवे : राजेंद्र पाटील

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हिडकल डॅम येथील श्री संगम सहकारी साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी सभासदांचे सहकार्य हवे असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. ते संगम साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या प्रतिमेचे …

Read More »

संकेश्वर पालिकेच्यावतीने कार्यवाहीचा बडगा..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि संसुध्दी गल्लीत रस्त्या शेजारी बसून भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापारींना आणि केळी, सफरचंदचे गाडे, भेळ गाडा हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम करुन दाखविले आहे. त्यामुळे आज बाजारात वाहतुकीची कोंडी थांबलेली दिसली. कालच्या पालिका सभेत कमतनूर वेस …

Read More »

बिजगर्णी येथे घर फोडून 54 हजार लंपास

  बेळगाव : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 54 हजारांची रोख रक्कम लंपास केली. बिजगर्णी (ता. बेळगाव) येथील कलाप्पा भास्कळ यांच्या घरी गुरुवारी ही घटना घडली. भर दुपारी झालेल्या धाडसी घरफोडीमुळे एकच खळबळ माजली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कल्लाप्पा भास्कळ पत्नी, मुलासमवेत नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून शेतात गेले …

Read More »

पीएफआय कार्यकर्त्यांचा महामार्गावर रास्तारोको

  बेळगाव : देशातील पीएफआय आणि एसडीपीआय संघटनांवरील आयटी आणि ईडीने धाड टाकल्याच्या विरोधात बेंगळुरू-पुणे रास्ता रोको करून आंदोलन करणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांना बेळगावच्या काकती पोलिसांनी अटक केली. पीएफआय कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. यावेळी आरएसएसच्या निषेधार्थ मुर्दा बादचा नारा देत केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. महामार्गावर किलोमीटर अंतरापर्यंत …

Read More »