Monday , April 20 2026
Breaking News

कित्तूर तहसीलदार लोकायुक्तांचा जाळ्यात

Spread the love

 

बेळगाव : कित्तूर तहसीलदार सोमलिंग हलगी व लिपिक प्रसन्न जी. हे लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले असून त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एका जागेच्या व्यवहारात खाते बदल करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपातून ही कारवाई करण्यात आली आहे.
कित्तुर तहसीलदार आणि लिपिक लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकल्यानंतर याचिकाकर्त्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. खोदानपूर येथील राजेंद्र इनामदार यांच्या दहा एकर जमिनीसंदर्भातील व्यवहारात लाच घेताना बेळगाव लोकायुक्तांनी रात्री छापा टाकून सदर कारवाई करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रणझुंझार चौक, निलजी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : रणझुंझार चौक, निलजी येथे रणझुंझार परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *