दुबई : आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकात 148 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 5 विकेट्स राखून पाकिस्तानच्या संघाला धुळ चारली. दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब …
Read More »रिंगण सोहळ्याने निपाणी नगरी दुमदुमली!
वारकरी, भाविकांचा उत्साह : माऊली, माऊलीचा गजर निपाणी (वार्ता) : टाळ मृदंगाचा गजर, हातात पताका, विणेकरी, चोपदार, पालखी सोहळा, आणि माऊली माऊली च्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अंकली येथील अश्वांचे येथील म्युनीशिपल हायस्कूलच्या पटांगणावर रविवारी (ता.२८) दुपारी प्रथमच श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत विजयराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत …
Read More »बरगावच्या इसमाचा अपघातात मृत्यू
खानापूर : पारीश्वाड क्रॉसपासून हाकेच्या अंतरावर पारीश्वाड रस्त्याच्या नाल्यावरील पुलाजवळच्या खड्ड्यामुळे रविवार दि. २८ रोजी बरगावच्या तरूणाचा बळी गेला. अमृत शंकर देसाई (वय ४२) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमृत देसाई हे रविवारी रात्री 7 च्या सुमारास दुचाकीने खानापूरहून आपल्या गावी बरगावला निघाले होते. या दरम्यान खानापूर-पारीश्वाड रस्त्याच्या निट्टुर …
Read More »स्वामीविरुद्धच्या प्रकरणी चौकशीतून सत्य बाहेर येईल; मुख्यमंत्री बोम्मईना विश्वास
बंगळूर : चित्रदुर्गातील एका प्रमुख मठाच्या मुख्य स्वामींचा समावेश असलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, ज्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी सांगितले. तथापि, चौकशी सुरू असल्याने त्यांनी स्वामीजी आणि प्रकरणावरील आरोपांबद्दल इतर कोणतीही टिप्पणी …
Read More »प्रेरणादायी निळकंठराव सरदेसाई; ज्येष्ठ नेते दिगंबर पाटील यांचे उदगार
खानापूर : तालुक्यातील जनतेला रोजगार आणि विकासाचा दूरदृष्टीकोण ठेवून भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याची स्थापना करणारे माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी व्हावे, हा दृष्टिकोन ठेवत महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला साखर कारखान्याने त्यांचा पुतळा कारखान्याच्या आवारात स्थापन करण्याचे ठरविले आहे. यास खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्ण …
Read More »हिंगणगाव येथे उद्या शांतिसागरजी महाराजांची पुण्यतिथी
रावसाहेब पाटील यांची माहिती: विविध कार्यक्रमाचे आयोजन निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी महोत्सव हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) सोमवारी (ता. २९) होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे …
Read More »महाप्रसादातून सामाजिक सलोखा : कृष्णवेणी गुर्लहोसूर
निपाणीत शनी अमावस्या सोहळा निपाणी (वार्ता): महाप्रसादासाठी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित येत असून स्नेहभोजनातून जातीय सलोखा निर्माण होतो. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. त्यामुळे अन्नदान झाले पाहिजे व ते टिकले पाहिजे, असे उपक्रम विविध ठिकाणच्या देवस्थान व मंदिर कमिटीने राबवून सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर …
Read More »मराठा मंडळ करंबळ हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर : मराठा मंडळ करंबळ हायस्कूल करंबळ येथील खेळाडूनी मराठा मंडळ खानापूर येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत खालीलप्रमाणे यश संपादन केले. मुलींचा खो-खो – प्रथम, मुलींची – कब्बडी द्वितीय, तसेच योगा कुमारी प्राची पाटील प्रथम कुमार रोहीत सुतार प्रथम, स्किपींग कुमारी नकुशा पाटील प्रथम, कुमार यकाप्पा पाटील प्रथम, …
Read More »हलकर्णी ग्रा. पं. अध्यक्षपदी प्रवीण अगणोजी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासून जवळ असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी प्रवीण मारूती अगणोजी तर उपाध्यक्ष पदी रेणूका मल्लापा कुंभार यांची निवड करण्यात आली. हलकर्णी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी प्रवीण मारूती अगणोजी व हरीश शीलावंत याच्यात लढत होती. यावेळी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामुळे प्रवीण अगणोजी यांना सात …
Read More »खानापूरच्या आठवडी बकऱ्यांच्या बाजारात लाखोंची उलाढाल
खानापूर : गणेश चतुर्थी सणाच्या दुसऱ्याच दिवशीच म्हणजे गुरूवारी ऋषी पंचमी (उंदरी) असल्याने खानापूरात आठवड्याच्या बकरी बाजारात बकऱ्यांच्या खरेदी विक्रीत लाखो रूपयाची उलाढाल झाल्याचे दिसून आले. गुरूवारी खानापूर तालुक्यात मोठ्याप्रमाणात उंदरीचा सण साजरा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी बकरी खरेदीसाठी तालुक्याच्या अनेक खेड्यातून नागरिकांनी बेळगाव-पणजी रोडवरील खानापूरच्या वेशीतील हलकर्णी गावाजवळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta