खानापूर : नेरसाजवळील गावळीवाडा अंगणवाडीच्या बाहेर झाडाला प्लास्टिक पिशवीत लटकवून नवजात अर्भकाला ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. आत्ता ते अर्भक अल्पवयीन जोडीदारांच्या प्रेम संबंधातून झाल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेबद्दल गेल्या दोन तीन दिवसांपासून वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते, त्या अर्भकाला अल्पवयीन मुलीने जन्म दिल्याचे समोर येताच या …
Read More »संकेश्वर श्री शंकराचार्य मठात कोटीलिंगार्चनची सांगता..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात श्रावणात महिनाभर चाललेल्या कोटीलिंगार्चन अनुष्ठानची भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली. कोटीलिंगार्चन पूजन अर्चन विसर्जन मिरवणुकीत श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, पुरोहित श्रीपाद उपाध्ये, वामन पुराणिक, संतोष जोशी, मदन पुराणिक, अवधूत जोशी, …
Read More »हिजाब प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकूण 24 याचिका सुनावणीसाठी; उच्च न्यायालय निर्णयाला आव्हान
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर एकूण 24 याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, उच्च न्यायालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश परिधान करणारा राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला …
Read More »भारत आणि पाकिस्तान आज आमनेसामने
दुबई : भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. आशिया कप 2022 स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. आता युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज रोहित शर्माच्या टीम इंडियाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. बाबर आझमच्या पाकिस्तानी फौजेनं टीम इंडियाचं विश्वचषकातलं निर्विवाद वर्चस्व मोडून काढलं, …
Read More »कर्नाटकातील शिक्षण खात्यातही भ्रष्टाचार बोकाळला
रुपसाचे पंतप्रधानाना पत्र, थेट शिक्षणमंत्र्यांवरही आरोप बंगळूर : कर्नाटक कंत्राटदार संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता नोंदणीकृत विनाअनुदानित खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेने (रुपसा) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारे पत्र पंतप्रधानाना पाठवले आहे. रुपसा …
Read More »आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानची विजयी सलामी!
अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय दुबई : शनिवारपासून (२७ ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवत श्रीलंका संघाला धूळ चारली. श्रीलंकेने दिलेल्या १०६ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने अवघी दहा षटके आणि एका चेंडूत पूर्ण केले. अफगाणिस्तानने श्रीलंकेवर आठ गडी राखून …
Read More »वडगाव येथील आनंदनगर, संभाजीनगर भागात गटारीचे पाणी घरात
बेळगाव : वडगाव येथील आनंदनगर, संभाजीनगर परिसरात गटारी नसल्यामुळे तसेच गटाराची सफाई केली नसल्यामुळे पावसाचे पाणी या परिसरातील घरामध्ये शिरले आहे. आनंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी फोटो आणि व्हिडीओमार्फत येथील परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आनंदनगर, संभाजीनगर अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर आदी भागातील नागरिकांनी वेळोवेळी ही समस्या …
Read More »अबब! महागाव येथे १,८८,६०० रूपयांच्या बनावट नोटासह तिघांना अटक, गडहिंग्लज पोलिसांची कारवाई
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महागाव (ता. गडहिंग्लज) गावच्या हद्दीत पाच रस्ता चौक येथे पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघाना बनावट नोटासह ताब्यात घेतल्याने गडहिंग्लज विभागात खळबळ उडाली आहे. महागावातील पाच रस्ता चौकात दोन इसम बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली …
Read More »महादेवा बिबट्याला जेरबंद कर रे बाबा….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात आयोजित कोटीलिंगार्चन समाप्ती सोहळ्यात राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सहभागी होऊन देवदर्शनाबरोबर श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचा आशीर्वाद घेतला. मंत्रीमहोदयांना बेळगांव गोल्फ कोर्स मैदानात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याची चांगलीच डोकेदुखी झालेली दिसत आहे. गेले …
Read More »येळ्ळूर येथे चोरट्यांचा धुमाकूळ!
बेळगाव : येळ्ळूर येथे शनिवारी पहाटे सराफी दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली. गावकरी साखरझोपेत असतानाच चोरट्यांनी साखळी चोऱ्या करून धुडगूस घातला. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळ्ळूर गावातील परमेश्वर नगर येथील बालाजी ज्वेलर्स हे दुकान शनिवारी पहाटे दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी फोडले. 5 लाख 50 हजार रु. किंमतीचे आठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta