Saturday , June 6 2026
Breaking News

बेळगांव व्हाया कित्तूर रेल्वे मार्गाला गर्लगुंजी शेतकऱ्यांचा विरोध

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : धारवाड- बेळगाव व्हाया कित्तूर होणाऱ्या रेल्वे मार्गाला जमीन अधिग्रहण प्राथमिक नोटिसा दिलेल्या आहेत. आक्षेप नोंदवण्यासाठी ३० दिवसाचा कालावधी आहे, त्यासाठी गर्लगुंजी गावातील शेतकऱ्यांची विरोध दर्शविण्यासाठी बैठक पार पडली.
यावेळी बैठकीत प्राथमिक बैठक घेऊन विरोध नोंदविला आणि आक्षेप नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, अशी चर्चा करण्यात आली. सुपीक जमिनीतून ह्या मार्गाला शेतकऱ्याचा विरोध राहील आणि अंतर वाढल्यामुळे सरकारचे जास्त पैसे खर्च होत आहे. गर्लगुंजी नंदिहळी, नागेनहट्टी, केकेकोप गावच्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून सुपीक जमिनीतून मार्ग घेण्यास विरोध केला आहे. त्यानंतर रेल्वे विभागाने परत २ सर्वे केलेले आहेत ते नापीक जमिनीतून आहेत आणि अंतर सुद्धा कमी होते. कमी खर्चात हा प्रकल्प होऊ शकतो आणि यासाठी ५ ग्राम पंचायतीचे ठराव सुद्धा रेल्वे विभाग आणि जिल्हाधिकारी, रेल्वे मंत्री मुख्यमंत्री यांना पाठविलेले आहेत. ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे पत्र सुद्धा रेल्वे बोर्डकडून शेतकऱ्यांना मिळाले पण खासदार मंगल सुरेश अंगडी यांनी रेल्वेच्या विभागीय बैठकीत आपण स्वतः पत्र देत पूर्वीचाच सुपीक जमिनीतून गेलेला मार्ग करावा असे बजावले असे माहिती अधिकाराखाली मिळवलेल्या पत्रात शेतकऱ्यांना माहिती मिळाली आहे, त्यामुळे शेतकरी पेटून उठले आहेत. त्यात या मार्ग बदलासाठी प्रसाद पाटील गर्लगुंजी आणि इतर शेतकरी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती आणि आतासुद्धा ही केस कोर्टात प्रलंबित असताना शेतकऱ्यांना प्राथमिक नोटीस देण्यात आल्या. त्यामुळे राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली हे सगळं घडतंय अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे पण कोणत्याही परीस्थितीत हा मार्ग सुपीक जमिनीतून होऊ देणार नाही. नाहीतर उग्र आंदोलन छेडले जाईल, असा शेतकऱ्यांनी यावेळी दिलेला आहे. गर्लगुंजी गावातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *